मुंडे यांच्या राजीनाम्यावरून भाजपमध्ये मतभेद? : यावर चंद्रकांतदादांनी दिले हे स्पष्टीकरण - no disagreement in BJP over Munde's resignation says Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मुंडे यांच्या राजीनाम्यावरून भाजपमध्ये मतभेद? : यावर चंद्रकांतदादांनी दिले हे स्पष्टीकरण

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंडे यांच्याविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.

पुणे : रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी कराच. पण नैतिकदृष्ट्या करुणा शर्मा यांच्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होती. खरे तर शरद पवार हे त्यांचा राजीनामा घेतील, असे अपेक्षित होते. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने सोमवारपासून आंदोलन करण्यता येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. 

मुंडे यांच्यावर रेणू शर्माने विविध आरोप केले आहेत. देशाच्या राजकारणातही असे आरोप झाल्यानंतर संबंधित नेत्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत, याची उदाहरणे देत मुंडे यांनी चूक मान्य केली याचा अर्थ ते निर्दोष नाहीत, असे चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले. तसेच रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केलेला असला तरी त्यांच्याविषयी सध्या विविध माहिती पुढे येत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करा असेही काहीजण म्हणत आहे. त्याची चौकशी करा, त्यावर आमचे काही म्हणणे नाही. मात्र करुणा शर्मा यांच्यापासून मुंडे यांना दोन मुले आहेत. त्याचा उल्लेख त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. असे संबंध हिंदू संस्कृतीला मान्य नाहीत. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. शरद पवार यांनीही मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांचे मतपरिवर्तन का झाले, हे मला कळाले नाही. मुंडे हे आरोपाआप राजीनामा देतील, असे आम्हाला वाटले. 

मुंडे यांचा राजीनामा मागण्यावरून देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात मतभेद नाहीत. फडणवीस यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. आमच्यात तुम्ही कितीही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणार नसल्याचे खात्री पाटील यांनी व्यक्त केली. 

मुंडे यांनी निवडणुकीत चुकीचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची तक्रार परळीतील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे करणार का, या प्रश्नावर पाटील म्हणाले की उमेदवारानेच याचिका केली पाहिजे असे नाही. कोणीही या मुद्यावर जनहित याचिका दाखल करू शकतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख