नितीशकाका आता थकले आहेत, तेजस्वी यादवांची टीका 

तेजस्वी यादव यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये नितीशकुमारांवर सडकून टीका केली आहे.
 नितीशकाका आता थकले आहेत, तेजस्वी यादवांची टीका 

पाटणा : मुख्यमंत्री नितीशकुमार हे मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या थकले आहेत अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे फायरब्रॅंड नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारात सर्व पक्षांनी आघाडी घेतली आहे. नितीशकुमार यांच्याविरोद्धात तेजस्वी यादव आणि लोक जनशक्ती पक्षाचे तरूण नेते चिराग पासवान हे दोन्ही तुटून पडताना दिसत आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमारांनी गेल्या पंधरा वर्षात जो कारभार केला आहे त्याचे वाभाडे हे दोन्ही नेते काढताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये नितीशकुमारांवर सडकून टीका केली आहे. 

यादव म्हणाले, की खरंतर नितीशकुमार मानसिक आणि शारिरीकदृष्ट्याही थकले आहे. त्यांनी पंधरा वर्षे बिहारवर राज्य केले. सत्ता उपभोगली आणि ते आता म्हणत आहेत, की राज्यातील लोकांना रोजगार द्यायचा तर पैसे आणणार कोठून ! मी या मंडळींना सांगू इच्छितो की यांनी आतापर्यंत साठ घोटाळे केले आहे. हे पैसे बिहारच्या तीस हजार कोटीचे आहेत यांनी खालेले पैसे गेले कोठे ? याचं उत्तर प्रथम नितीशकुमार यांनी आम्हाला द्यायला हवे. 

नितीशकुमार जातीयवादाला प्रोत्साहन देतात 
लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा चिराग पासवान यांनीही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की नितीशकुमार हे जातीयवादाला प्रोत्साहन देतात याचे मला आश्‍चर्य वाटते. जी व्यक्ती जातीयवादाला पाठिंबा देते अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास काय करणार असा सवालही त्यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा जाहीर केला. 

हे ही वाचा :  
तेजस्वी यादवांकडून चिराग पासवान यांचे समर्थन

 बिहार निवडणुकीचा प्रचार हळूहळू जोर धरु लागला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांची ही राजकीय खेळी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.  

‘‘नितिश कुमार यांनी चिराग पासवान यांच्याबरोबर जे केले ते चांगले नाही. चिराग यांना त्यांच्या वडिलांची कधी नव्हे ते आत्ता गरज आहे. पण रामविलास पासवान आता आपल्यात नाहीत आणि याचे आम्हाला दुःख आहे. नितीश कुमार यांची वर्तणूक चिराग यांच्यावर अन्यायकारक होती,’’ असे तेजस्वी यादव म्हणाले. 

बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीकडून  तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्याकडून टीकेचा भडीमार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.तेजस्वी यादव यांनी सोमवारी चिराग यांची बाजू घेतली. 

  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com