नितीशकुमार यावेळी मुख्यमंत्री होणार नाहीत, चिराग पासवान यांचा दावा  - Nitish Kumar will not be the Chief Minister this time, claims Chirag Paswan | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमार यावेळी मुख्यमंत्री होणार नाहीत, चिराग पासवान यांचा दावा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

नितीशकुमार यांच्या जेडीयूचा प्रत्येक उमेदवार कसा पराभूत होईल हेच आमचे स्वप्न आहे. इच्छा आहे. नितीशकुमार हे मित्रपक्षाला किंमत देत नाहीत.​

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीतील हालचाली दिवसेंदिवस अधिकच गतीमान होत चालल्या आहेत. एकीकडे प्रचाराच्या धामधूमीत लालू प्रसाद यांच्या दोन्ही पोरांना अडकविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे नितीशकुमार यांच्या अडचणीत भर कशी पडेल यासाठी त्यांचे विरोधकही सज्ज झाले आहेत. आता यामध्ये या पक्षाच्या एका जुन्या मित्राची भर पडली आहे. 

रामविलास पासवान बनेंगे केंद्र में कैबिनेट मंत्री, बिहार के BJP कोटे से  जाएंगे राज्यसभा - ram vilas paswan cabinet minister centre bjp s rajya  sabha bihar quota - UP Punjab Kesari

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी भाजप आणि जेडीयूची नेहमीच साथसंगत केली. तसेच ते लालूप्रसाद यांच्याबरोबरही राहिले आहेत. केंद्रात ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाबरोबर राहायचे आणि मंत्रिपद पटकवायचे. राष्ट्रीय राजकारणात राहायचे आणि राज्यात काही जागा मिळवून समाधान मानायचे हे लोक जनशक्ती पक्षाचे विशेषत: पासवान यांचे राजकारण राहिले आहे. जागा वाटपात दबाव आणून पदरात काही जागा पाडून घेण्यात या पक्षाने नेहमीच धन्यता मानली आहे. 

यावेळच्या निवडणुकीच्या काळातच स्वत: रामविलास पासवान आजारी पडले आहेत. त्यामुळे या पक्षाची जबाबदारी अर्थात त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. मात्र भाजप आणि जेडीयूने समसमान जागा वाटून घेतल्या आणि पासवान यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. भाजपने त्यांना आपल्या कोट्यातील काही जागा देण्याचे मान्य केले होते. परंतू चिराग हे नाराज आहेत. त्यांची भाजपपेक्षा नितीशकुमारांवरच अधिक नाराजी असल्याचे दिसून येत आहे. 

Amit Shah on Twitter: "Pictures from the ongoing @BJP4India Central  Election Committee meeting chaired by BJP National President Shri @JPNadda  ji in presence of PM Shri @NarendraModi ji at BJP HQ, New

चिराग पासवान यांनी एनडीटीव्हाला दिलेल्या खास मुलाखतीत नितीशकुमारांना लक्ष्य केले आहे. चिराग यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले आहे, की नितीशकुमार यांच्या जेडीयूचा प्रत्येक उमेदवार कसा पराभूत होईल हेच आमचे स्वप्न आहे. इच्छा आहे. नितीशकुमार हे मित्रपक्षाला किंमत देत नाहीत. त्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत. जेडीयूबरोबर असणे ही आमची मजबुरी होती. आता आमच्या पक्षाचे एकच लक्ष्य आहे नितीशकुमारांना हरविण्याचे. 

चिराग पासवान म्हणाले, की मी नेहमीच नितीशमुार यांच्या विरोधात होतो. मात्र काही कारणं अशी असतात की एकत्र राहिलो. एनडीएत राहण्यासाठी आमच्या पक्षावर भाजपचा कोणताही दबाव नाही आणि आमची निष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. निकालानंतरही आम्ही जेडीयूशी बोलणी करणार नाही. बीजेपी आणि एजपीजीचे डब्बल इंजिनचे सरकार राज्यात आलेले आपणास दिसेल.

जेडीयूप्रमाणे भाजपच्या काही उमेदवारांविरोधात आम्ही लढणार आहोत. नितीशकुमारांचा यावेळी आम्ही नव्हे तर जनताच पत्ता कट करेल. नितीशकुमार यांच्यावर चिराग पासवान हे नाराज आहेत. ते भाजपची बाजू घेतात पण जेडीयूची नाही. पासवान यांना नितीशकुमारांनी या निवडणुकीत किंमत दिली नाही अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू आहे. त्यामुळे त्यांचा रोष अर्थात नितीशकुमार यांच्यावरच आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख