नितीशकुमार, लालूंनी मुसलमानांना फसविले, ओवेसींचा आरोप  - Nitish Kumar, Lalu deceived Muslims, Owaisi alleges | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमार, लालूंनी मुसलमानांना फसविले, ओवेसींचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 सप्टेंबर 2020

गेल्या दहा वर्षांत बिहारमधील मुस्लीम जनता राजकीय फसवणुकीला बळी पडली आहे.

पाटणा ः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे लालू प्रसाद यांनी मुसलमानांना फसविल्याचा आरोप एमआयएमचे नेते अिाण खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. 

त्यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी जनता दलाचे प्रमुख देवेंद्र यादव यांच्याशी युती केली आहे. 

या युतीला संयुक्त लोकशाही धर्मनिरपेक्ष आघाडी (यूडीएसए) असे नाव दिले आहे. ओवेसी आणि देवेंद्र यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीत अनेक पक्ष सहभागी होतील, असा दावा करीत त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे सांगितले. ओवेसी यांनी कोणाची जहागिरी नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली. 

ओवेसी यांनी लालू प्रसाद आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर मुसलमानांना फसविल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत बिहारमधील मुस्लीम जनता राजकीय फसवणुकीला बळी पडली आहे.पक्ष अशी टीका आमच्यावर करणाऱ्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची काय दशा झाली, हे लक्षात ठेवावे, असा टोला त्यांनी लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांना लगावला. 

ओवेसी यांच्या पक्षाचा एक उमेदवार पोटनिवडणुकीत विजय मिळवून बिहार विधानसभेत पोचला आहे. च्या निवडणुकीत ओवेसी यांनी मुस्लीम बहुल मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार उभे केले होते, पण त्यांना यश मिळाले नाही. 

ओवेसी व देवेंद्र यादव यांची आघाडी आगामी निवडणुकीत मुस्लीम बहुल मतदारसंघात मतांचे विभाजन करण्यात यशस्वी झाली तर त्याचा मोठा फटका लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला बसू शकतो. लालू यांच्या यादव व मुस्लीम समाजाच्या मतपेढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हाच धोका नितीश कुमार यांच्यासमोरही आहे. ओवेसी यांच्या उमेदवारांना कमी मते मिळाली तरी लालू यांच्या आरजेडीव नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षासाठी ते नुकसानकारक ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख