विधानसभा अध्यक्षपदी नितीन राऊत तर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?

कुठलीही गडबड होऊ नये यासाठी आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
Nitin Raut, Praniti Shinde.jpg
Nitin Raut, Praniti Shinde.jpg

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  हे पद काँग्रेसकडे असून, अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाचाही विचार काँग्रेस पक्षाकडून सुरु आहे. (Nitin Raut as Assembly Speaker and Praniti Shinde as Minister Question mark )

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यात दलित मतदारांना पक्षाकडे वळवण्याची सूचना केली होती. त्यानुसार नितीन राऊत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतील आले आहे. तर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.   

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होती की, विधानसभा अध्यक्ष निवड या विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होईल. काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. मी मंत्रिपदाची मागणी केली नाही. पक्ष देईल ती जबादारी मी पार पाडत आहे आणि माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नाही. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही नाराजी नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली असून, यात अधिवेशन आणि इतर विषयांवर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवे धोरण आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने 23 जूनला राज्यपालांची भेट घेतली होती. यात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. यावर राज्यपालांनी 24 जूनला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसमधून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमिन पटेल यांच्या नावाचीही चर्चा आहे.   

दरम्यान, अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आमदारांना कोरोनाची RTPCR टेस्ट करावी लागणार आहे.  48 तास अगोदर ही टेस्ट करावी लागणार आहे. यासाठी विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित कारण्यासाठी दिल्लीतील नेते मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे. उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कडून राज्यपालांना पत्र पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, कुठलीही गडबड होऊ नये यासाठी आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.  

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com