नितीन गडकरींनी लसींच्या तुटवड्यावर केंद्राला दिला सल्ला; म्हणाले…  - Nitin Gadkari advises Center on vaccine shortage | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन गडकरींनी लसींच्या तुटवड्यावर केंद्राला दिला सल्ला; म्हणाले… 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 19 मे 2021

देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) संकटाचा सामना करण्यासाठी येणारी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरण (Vaccination) हाच एक मार्ग आहे. मात्र, देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यांनी अपुऱ्या लस पुरवठ्यावरुन केंद्रा सरकारवर टीका सुरु केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राला सल्ला दिला आहे. (Nitin Gadkari advises Center on vaccine shortage)

हे ही वाचा : गंगेत मृतदेह ; मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

गडकरी म्हणाले, ''देशांतर्गत कंपन्यांना लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा, जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी आणखी १० कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्यावी. त्यांना देशात पुरवठा करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात. हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते,'' असे गडकरी यांनी सांगितले. 

यावेळी गडकरी यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी योग्य व्यवस्था करण्याची देखील सूचना केली. चंदनऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल असेही गडकरी म्हणाले.

गुरुवारी, केंद्र सरकारने आपल्या लस पुरवठ्याचा आराखडा सादर केला होता. मे अखेर पर्यंत लसीकरणासाठी ७.३० कोटी डोस उपलब्ध होतील असे सांगितले होते. यापैकी १.२७ कोटी डोस हे थेट राज्यांना खरेदी करता येणार आहेत, तर ८० लाख खाजगी रुग्णालयांना खरेदी करता येणार आहेत.

हे ही वाचा : दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारु नका..''राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा...

दरम्यान, चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र, सध्या देशात लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे देशातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ. रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख