विदर्भात १०२८ कोटींचे रस्ते होणार...नितीन गडकरींनी दिली ७७ प्रकल्पांना मंजुरी

उपराजधानी नागपूरला १२ प्रकल्प मिळाले
Sarkarnama Banner (81).jpg
Sarkarnama Banner (81).jpg

नागपूर : महाराष्ट्रातील २०४० कोटींच्या २७२ प्रकल्पांना गुरुवारी केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. यात विदर्भातील १०२८ कोटींच्या ७७ प्रकल्पांचा यात समावेश आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला या मंजूर कामाची यादी पाठविली असून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ही सर्व कामे होणार आहेत.

उपराजधानी नागपूरला १२ प्रकल्प मिळाले असून या प्रकल्पांची किंमत १४५.६९ कोटी रुपये आहे. जिल्ह्यातील काटोल येथील रेस्ट हाऊस ते मटण मार्केट, कुही तालुक्यातील वाग वीरखंडी तारना येथील लहान व मोठा पूल बांधकाम, नागपुरातील कळमना उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे सर्व्हिसिंग रोड, इनर रिंगरोडजवळ लहान पूल व भिंतीचे बांधकाम, थातुरवाडा, बेलाभिष्णूर, तिनखेडा, खरसोली, नरखेड, मोहाडी ते मध्यप्रदेश सीमेपर्यंतचा रस्ता, रामटेक तालुक्यातील छत्तरपूर, बोर्डा, खुमारी, भोंडेवाडा, भंडारबोडी, अरोली रस्त्यावरील लहान पुलाचे बांधकामांना मंजूरी देण्यात आली आहे.

सीपीआरएफ प्रवेशद्वार लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन, रायसोनी कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पिटल, शिवणगाव सीमेपर्यंत रस्त्यात सुधारणा, उमरेड तालुक्यातील बेला ठाणा रस्ता , नरसाळा गारगोटी ते दिघोरी नाका ते खरबी, जिजामाता नगर ते तरोडी, बिडगाव, कापसी पावनगाव, घोरपड रोड, रस्त्याचे बांधकाम, नरसाळा गारगोटी ते दिघोरी नाका ते खरबी, जिजामाता नगर ते तरोडी, बिडगाव, कापसी पावनगाव, घोरपड रोड, रस्त्याचे बांधकाम, मोवाड, खरसोली, जुनोना, घराड,थुगाव, निपाणी, उमरी, वाडेगाव, मोहाडी, धोत्रा, तोलापार, मोगरा रस्त्यावर खरसोली गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम, जुनी कामठी येथे पुलाचे बांधकाम यामाध्यमातून होणार आहे. याशिवाय अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील रस्त्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com