"ओबामाचं आता काही खरं नाही..." संजय राऊतांना निलेश राणेंचा टोला - Nilesh Rane taunts Sanjay Raut says Barack Obama wont be able to sleep now | Politics Marathi News - Sarkarnama

"ओबामाचं आता काही खरं नाही..." संजय राऊतांना निलेश राणेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

संजय राऊत यांच्या या व्यक्तव्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. याबाबाच निलेश राणे यांनी टिवट् केलं आहे.

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे व्यक्तीमत्त्व चिंतेने भरलेले असल्याचे वर्णन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांनी आपल्या 'ए प्राॅमिस्ड लँड' या आत्मचरित्रात केले आहे. आपल्या या आत्मचरित्रात ओबामा यांनी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्याही स्वभावाचे वर्णन केले आहे. 

यावर शिवसेनेचे खासदार यांना पत्रकारांनी विचारले असता काल राऊत म्हणाले होते की अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची मते काय माहिती नाही पण हिंदुस्थान मधील नेत्यांबाबत अस बोलणं चुकीचं आहे त्यांना अधिकार दिला कोणी ? ओबामांनी एक वक्तव्य करायचं आणि त्याच राजकारण इथल्या नेत्यांनी केलं ते चुकीचे आहे. राहुल गांधी खूप चांगलं काम करीत आहेत. नरेंद्र मोदींबाबत ते जर हे बोलले तरिही माझी भूमिका हीच असेल.

संजय राऊत यांच्या या व्यक्तव्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. याबाबाच निलेश राणे यांनी टिवट् केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये राणे म्हणतात की शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल. आता ओबामाचं कसं होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामाचं आता काही खरं नाही.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांच्या 'ए प्राॅमिस्ड लँड' या या आत्मचरित्राचा काही अंश अमेरिकेच्या काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी हे वर्णन केले आहे. ''आपला अभ्यासक्रम पूर्ण करुन शिक्षकाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करणारा पण आपल्या विषयात प्राविण्य मिळविण्याची क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यासारखे राहुल यांचे व्यक्तिमत्त्व आहे,'' असेही ओबामा या पुस्तकात म्हणतात.

सोनियांचाही उल्लेख
ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख केला आहे. त्या हँडसम असल्याचे मत ओबामा यांनी नोंदवले आहे. ''आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रेहेन एमॅन्यूल यांच्यासारखे पुरुष हँडसम असल्याचे सांगितले जाते. पण महिलांबद्दल बोलले जात नाही. याला सोनिया गांधी यांच्यासह एक दोन अपवाद असतील,'' असे ओबामा या आत्मचरित्रात म्हणतात. ओबामा यांनी अमेरिकेचा माजी संरक्षण मंत्री बाॅब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Dr. Manmohansingh) यांचे कैातुक या आत्मचरित्रात केली आहे. दोघांमध्ये भावशून्य प्रामाणिकपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओबामांचे हे आत्मचरित्र १७ नोव्हेंबरला बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख