निष्ठावंत शिवसैनिक आता जागले नाहीत.. तर ते स्वतःचं वाटोळं करून घेतील : राणे - Nilesh Rane said If the loyal Shiv Sainiks are not awake now they will take care of themselves | Politics Marathi News - Sarkarnama

निष्ठावंत शिवसैनिक आता जागले नाहीत.. तर ते स्वतःचं वाटोळं करून घेतील : राणे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

"जुने शिवसैनिक जर या क्षणाला जागले नाहीत तर ते स्वतःचं वाटोळं करून घेतील... नंतर कोणाला दोष देऊन उपयोग नसतो. "

पुणे : राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव पाठविले असल्याची चर्चा सुरू आहे. तर अभिनेता शरद पोंक्षे यांचेही नाव राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने पाठविले असल्याचे समजते. यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसैनिकांना उद्देशून टि्वट केले आहे. 

पक्षात नव्याने आलेल्यांना शिवसेना आमदार करण्याच्या विचारात आहे, त्यामुळे जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.  या पार्श्वभूमीवर निलेश राणे टि्वट केलं आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "जुने शिवसैनिक जर या क्षणाला जागले नाहीत तर ते स्वतःचं वाटोळं करून घेतील... नंतर कोणाला दोष देऊन उपयोग नसतो. जय महाराष्ट्र."

"ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी.. नुस्त बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा.," असं टि्वट काल निलेश राणे यांनी केलं होत.  

निलेश राणे यांनी याबाबत टि्वट करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे होती. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले होते. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या सहकार्याने सरकार बनवून मुख्यमंत्री झालेले उध्दव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे. याबाबत आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवार यांनी भगवा फडकणार असे मी गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकत आहे, असे म्हणाले होते.

टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, "महाविकास आघाडीचे सरकार इतकं पुळचट आहे की न्यायालय त्यांना साधी तारीख सुद्धा देत नाही. ७ ऑक्टोबर नंतर घटनापीठ तरी स्थापन करा हे सांगण्यासाठी काल परत अर्ज केला.९ सप्टेंबरला दिलेला आदेश पण अजून पर्यंत घटनापीठ स्थापन झाली नाही ही लायकी ठाकरे सरकारची आणि नुकसान मराठा समाजाचं. "

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक करताना भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणतात की मानलं पवार साहेब आपल्याला महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली अशा शब्दांत राणे यांनी निशाना साधला होता.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख