नीलेश राणे म्हणाले, संजय राऊतांना सेनाभवनात जाऊन फटके लगावणार...

आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही.
 Nilesh Rane, Sanjay Raut .jpg
Nilesh Rane, Sanjay Raut .jpg

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज 'सामना'च्या अग्रलेखातून भाजप नेत्याचा खरपूस समाचार घेतला आहे. अग्रलेखातून भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्याला नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Nilesh Rane criticizes Shiv Sena MP Sanjay Raut)  

या संदर्भात नीलेश राणे यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की हे काय ऐकतोय मी की संजय राऊत धमकी द्यायला लागलेत, राऊत तुम्ही फटाके खाणारच आहात पण खास तुमच्यासाठी तुम्हाला सेनाभवनच्या आत नेऊन फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत. राऊत धमक्या द्यायच्या आधी विचार करा तुमची सेना आता ncp आणि काँग्रेससमोर लाचार झाली आहे. त्यांची लाल कर आधी.

दुसऱ्या ट्वीटमध्ये नीलेश राणे म्हणाले शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संजय राऊत मोजून बघा. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही. राऊत काय सांगता. अशा शब्दात राणे यांनी टीका केली आहे.

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. ''भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! कशात काही नसताना झुरळांच्या तांड्यांसारखे आपापल्या खुराड्याच्या गच्चीवर येऊन नरडी फुगवून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित!, अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली होती.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com