'या' देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला 'अच्छे दिन'   - The Nigerian government has banned Twitter | Politics Marathi News - Sarkarnama

'या' देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला 'अच्छे दिन'  

वृत्तसंस्था
रविवार, 6 जून 2021

ट्वीटरने शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवली होती.

नवी दिल्ली : भारतामध्ये समाजमाध्यमांसंदर्भातील नवीन नियमांवरुन ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहेत. त्यातच काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डल आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टीक हटवल्याने या वादात पुन्हा एकदा नवी ठिणगी पडली. (The Nigerian government has banned Twitterr)

दरम्यान, आफ्रिकेमधील नायजेरियामध्ये (Nigerian) ट्विटरने राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याने नायजेरियन सरकारने ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद्दू बुहारी यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत ट्विटरने त्याच्या हॅण्डलवरील ट्विट डिलीट केले. त्यानंतर सरकारने शुक्रवारी ट्विटरवर बंदी घालत असल्याची घोषणा केली. मात्र, या साऱ्या गोंधळामध्ये नायजेरियामध्ये ट्विटरची जागा घेण्याचा प्रयत्न कू ही भारतीय कंपनी करत आहे. कू कंपनीचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कंपनीला अच्छे दिन येतील असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा : माजी सभापती मंगलदास बांदलांचा सोपवारपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम

कू चे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी नायजेरियामध्ये ट्विटरवर बंदी घातल्यानंतर एक ट्विट केले आहे.  त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की ''कू आता नायजेरियामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आम्ही तेथील स्थानिक भाषांमध्ये सेवा देण्याचा विचार करत आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?,'' यावेळी त्यांनी ट्विटमध्ये नायजेरियात कू उपलब्ध असल्याचा स्क्रीनशॉर्टही शेअर केला आहे. 

ट्वीटरने शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवली होती. याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केली.  टि्वटरने केवळ व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरीलच ब्लू टिक काढलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विटरने 'ब्लू टिक' काढला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली असल्याचे संघाचे राजीव तुली यांनी म्हटले होते. 

ट्विटरच्या अटींनुसार, जर कोणी त्याच्या हँडलचे नाव बदलले (@ हँडल) किंवा वापरकर्त्याने त्याचे खाते ज्या पद्धतीने वेरिफाई केले त्या पद्धतीने वापरत नाही. तर या प्रकरणात निळा टिक म्हणजे blue verified badge काढून टाकते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या या ट्विटर अकाऊंटवरून गेल्या 11 महिन्यांपासून कोणतेही ट्विट केलेले नाही. या खात्यात अखेर 23 जुलै 2020 रोजी ट्विट केले गेले होते. 

हे ही वाचा : तलवारी, रिव्हॅाल्वर घेऊन फिरणाऱ्याची संजय राऊतांकडून पाठराखण

जुलै 2020 पासून ट्विटर अकाऊंट वापरात नसेल, तर ते अकाऊंट आपोआप इनअॅक्टीव्ह होते आणि त्यावरील ब्लू टिक गायब होते, असे ट्विटरने म्हटले होते. ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचे नाव बदलले गेले असेल किंवा एखादं अकाऊंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केले जाते आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. 

एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल पण नंतर त्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील, तर ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असे सांगितले जात आहे. 
 Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख