मराठा आरक्षणावर आता 14 जुलै रोजी सुनावणी; तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढेच युक्तिवाद

पहिल्यांदा पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणावर निकाल येण्याची शक्यता...
Maratha-Morcha1-Final
Maratha-Morcha1-Final

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी आता 14 एप्रिल रोजी होणार आहे.  पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणासंदर्भात या तारखेला अंतरिम सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठापुढे आजची आॅनलाइन सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील शाम दिवाण यांनी अशा विषयांत आॅनलाईन सुनावणीपेक्षा थेट न्यायालयात सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. यावर सध्याच्या वातावरणात पाच न्यायमूर्तींनी एकत्र येणे कितपत योग्य आहे, असा सवाल न्यायमूर्तींनी केला. अंतरिम निकालासाठी पाचही याचिका एकत्र विचारात घेऊ असे न्यायालयाने सांगितले.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रक्रिया येत्या ३० जुलैपर्यंत संपत आहे. त्यामुळे त्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल अशी शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका आहे. मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवण्यासंबंधी बोलताना त्याची गरज वाटत नसल्याचे सांगितल्याने याच खंडपीठापुढे सुनावणी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दर दिवशी सुनावणी होईल कोणत्या वकिलाला किती वेळ लागेल, हे त्यांनी आपापसांत बोलून सांगावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

“मराठा आरक्षण इतका मोठा विषय आहे की व्हर्च्यूअल माध्यमातून सर्व गोष्टी सादर करणं शक्य होणार नाही. यासाठी सप्टेंबरमधील तारीख मागण्यात आली. हा फार संवदेनशील विषय असल्याने समोरासमोर सुनवाणी होणं गरजेचं आहे असं मत आहे,” असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com