येत्या काळात नव्याने रोजगार निर्मिती होण्याची शक्यता कमीच :राहुल गांधी - New jobs are unlikely to be created in the near future: Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

येत्या काळात नव्याने रोजगार निर्मिती होण्याची शक्यता कमीच :राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

छत्तीसगडमधील २२ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पक्षाच्या कार्यालयांच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला.

रायपूर : मोदी सरकारने देशातील असंघटित क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला नख लावले असून मागील सहा वर्षांच्या कालखंडामध्ये शेतकरी, कामगार आणि लघू उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

सरकारच्या या धोरणामुळे येत्या काळात नव्याने रोजगार निर्मिती होण्याची शक्यता कमीच असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

छत्तीसगडमधील २२ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पक्षाच्या कार्यालयांच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. यावेळी बोलताना राहुल यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरून सरकारवर निशाणा साधला.

देशातील असंघटित क्षेत्रातून ९० टक्के एवढे रोजगार निर्माण होतात. नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करण्यात आल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. 

चिदंबरम यांचा पीएमकेअरवर निशाणा 
काँग्रेसने पीएम केअर निधीवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. या निधीची कोणत्याही पातळीवर पडताळणी होऊ नये म्हणून सरकार तो दडवून ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.

चिदंबरम यांनी या निधीच्या अनुषंगाने अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलासा देताना पीएम केअर फंड हा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये वर्ग करण्याचे आदेश द्या अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख