लग्नाला यायचंय मग आधी कोरोना चाचणी करा! निगेटिव्ह रिपोर्टशिवाय 'नो एंट्री'

देशभरात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.
Negative RT PCR test report mandatory for wedding
Negative RT PCR test report mandatory for wedding

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे देशातील बहुतेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. लग्न समारंभासह विविध धार्मिक विधींमध्येही लोकांच्या संख्येवर मर्यादा आणल्या जात आहेत. पण अनेक ठिकाणी हे बंधन पाळले जात नसल्याचेही चित्र आहे. पण एका लग्नामध्ये कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याशिवाय वऱ्हाडी मंडळींना प्रवेशच दिला जाणार नाही.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याबाबतीत आता नागरिकही जागृत होत असल्याने स्वत:हून अनेक बंधने घालून घेत आहेत. अशाच एका लग्नाच्या तयारीची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील एक लग्न पुढील आठवड्यात आहे. पण या लग्ना उपस्थित राहण्यासाठी वधु व वराच्या बाजून सर्वांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणण्यास सांगितले आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. 

जयपुरमध्ये 24 एप्रिलला हे लग्न होणार आहे. त्याआधी 18 एप्रिलला एका खास कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. पण या कार्यक्रमातही केवळ 18 नातेवाईकांना निमंत्रण दिले आहे. याविषयी बोलताना वराचा भाऊ अजय सिंग म्हणाला, लग्न 24 तारखेला होणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लग्नपत्रिकेतच आरटीपीसीआर रिपोर्ट आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येकाला सॅनिटायझरचा वापर करण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही सर्व कार्यक्रम आनंदात साजरा करू शकू.

सरकारनेही प्रत्येक वधु व वराच्या कुटूंबातील प्रत्येकी 50 जणांना लग्नात उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेत आनंदात सहभागी व्हावे. पण प्रत्येकाला रिपोर्ट देणे शक्य होणार नाही. तसेच संख्येवर मर्यादा असल्याने अनेकांना उपस्थित राहता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशभरात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना अधिक दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनाही कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकट्या महाराष्ट्रात दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. आता इतर राज्यांतील रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com