राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाने या कारणामुळे हाती बांधले शिवबंधन!

चिखले यांच्या शिवसेना प्रवेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चलबिचल होती.
NCP's Khed city president Satish Chikane joined Shiv Sena for this reason
NCP's Khed city president Satish Chikane joined Shiv Sena for this reason

खेड : खेड नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने खेड तालुक्यात दलबदलू राजकारणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांत या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारीवर डोळा ठेवून पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवून पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (NCP's Khed city president Satish Chikane joined Shiv Sena for this reason)

दरम्यान, खेडच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड शहराध्यक्ष आणि खेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आपल्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे चिकणे यांनी म्हटले आहे. मात्र, राजकीय समीक्षकांना हे कारण पटणारे नाही. गेल्या निवडणुकीत चिकणे यांचा पराभव झाल्याने व सध्याची पक्षाची स्थिती पाहून चिकणे यांनी हातात शिवबंधन बांधल्याचे बोलले जात आहे.

खेड नगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. पालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल याचा अभ्यास करून राजकीय पक्षाचे नेते कुणाला उमेदवारी द्यायची, याची चाचपणी करू लागले आहेत. ज्यांना या निवडणुकीत 100 टक्के उमेदवारी मिळणार, याची खात्री आहे ते पदाधिकारी पक्षासोबत आहेत. परंतु ज्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री नाही, ते पदाधिकारी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू लागले आहेत.

शिवसेनेत दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी या आधी आपापल्या पक्षात राहून नगरसेवक पद उपभोगलेले आहे. मात्र, या वेळी पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने हे पदाधिकारी शिवबंधन हाती बांधत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि खेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. चिखले यांच्या शिवसेना प्रवेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चलबिचल होती. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी काळात अन्य पक्षाचे आणखी काही पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com