पडळकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा आणि चोप देण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

पडळकरांना राज्यात फिरू न देण्याच इशारा
gopichand padalkar
gopichand padalkar

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांना चोप देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पंढरपूर येथे बोलताना पडळकर यांनी हे वक्तव्य केले होते. त्याविरोधात युवक राष्ट्रवादीने पडळकरांच्या तोंडाला काळे फासून त्यांना चोप देणार असल्याचा इशारा दिला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर हे राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते. पवारांवर टीका केली की मोठे होता येते, असा भाजपमधील मंडळींचा समज झाला आहे. त्यातून अशी वक्तव्ये येतात. मात्र पडळकरांना त्याच्या राजकीय परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 

पडळकर यांनी काल बारामतीत बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात परिवर्तन करणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ते बुधवारी पंढरपुरात पोहोचले आणि खालच्या पातळीवर पवारांवर टीका केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरूवारी सकाळी आंदोलन

राष्ट्रवादीने पुण्यात पडळकरांच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय जाहीर केला आहे. `राजकारणात मतभेद असू शकतात. एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर त येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का असा आमचा प्रश्न आहे,. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10  वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले आहे.

भाजपच्या नेत्यांनी पडळकरांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर यांनी याबाबत पक्ष सहमत नसल्याचे सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com