राष्ट्रवादीचे उदय शेळके यांची नगर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड

उदय शेळके हे पारनेर तालुक्यातील असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.
shelke6.jpg
shelke6.jpg

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय शेळके यांची आज निवड झाली. आज दुपारी नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी जाहीर केले. 

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर उपाध्यक्ष पदाची निवड सुरू झाली. या पदावर काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची निवड झाली. उदय शेळके हे पारनेर तालुक्यातील असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. तसेच कानवडे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

आज सकाळी 11वाजल्यापासून महसूलमंत्री थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख तसेच नेत्यांचे खलबते सुरू होते. दुपारी एक वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. निवडीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा बॅंकेच्या 21 संचालकांपैकी 17 संचालक बिनविरोध निवडून आले. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक झाली. अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आले. अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

हेही वाचा : स्थायीच्या सभापतीपदी अविनाश घुले बिनविरोध होण्यासाठी असे झाले राजकारण
 
नगर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय पठारे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अविनाश घुले हे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडले गेले. स्थायी सभापती होण्याची ही दुसरी वेळ आहे, तर स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा आघाडीचा धर्म पाळण्याच्या नावाखाली शिवसेना नगरसेवकांना माघार घेत तोंडघशी पडावे लागले. महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेकडून विजय पठारे यांनी दोन, तर राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. घुले यांनी पठारे यांच्या दोन्ही अर्जातील अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या बोगस असल्याचे सांगितले होते. अर्ज छानणीच्या वेळी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या समोर घुले यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. पठारे यांच्या दोन्ही अर्जांना एकच सूचक असल्याने एक अर्ज छानणीच्या वेळी डॉ. भोसले यांनी बाद ठरविला. अर्ज माघारीसाठी 15 मिनिटांचा कालावधीत देताच विजय पठारे यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे घुले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com