जयंत पाटलांनाही ओबामांच्या प्रचाराची भूरळ..  - NCP state president Jayant Patil is also fascinated by Obama's campaign    | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांनाही ओबामांच्या प्रचाराची भूरळ.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

"अमेरिकेच्या निवडणुकीत माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी जो बायडेन यांच्यासाठी दररोज पन्नास फोन केले. तसे फोन महाविकास आघाडीतील प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी रोज करावेत," अशी सूचना  जयंत पाटील यांनी दिली आहे. 

पुणे : "अमेरिकेच्या निवडणुकीत माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी जो बायडेन यांच्यासाठी दररोज पन्नास फोन केले. तसे फोन महाविकास आघाडीतील प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी रोज करावेत," अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. 

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. आपले नेते राहुल गांधी यांचा अपमान करणाऱ्या ओबामाप्रमाणे प्रचार करण्याची जयंत पाटलांची सूचना काँग्रेसचे कार्यकर्ते मानणार का, अशी चर्चा बैठकीनंतर सुरू होती. 

बैठकीला तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. विश्वजीत कदम, सतेज पाटील, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह पदाधिकारी प्रथमच काँग्रेस भवनात आले होते. 
 
जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात यांच्या सहीने निघाले 'हे' पत्रक  
मुंबई : राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची
निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे प्रसिद्धपत्रक जारी करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केले
आहेत.

या प्रसिद्धीपत्रकात महाविकास आघाडीच्या नेत्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
यामुळे महाविकास आघाडीने उमेदवाराच्या नावाबाबत पडदा टाकलेला दिसतो. 

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार :

1) अमरावती शिक्षक मतदारसंघ - श्रीकांत देशपांडे (शिवसेना)
2) पुणे शिक्षक मतदारसंघ - जयंत आसगांवकर (काँग्रेस) 
3) पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
4) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण
(राष्ट्रवादी काँग्रेस) 
5) नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजित वंजारी (काँग्रेस) 

अशी रंगणार लढत

नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढत
 - अभिजित वंजारी (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), राहुल वानखेडे (वंचित), नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)

औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातील लढत  
शिरीष बोराळकर (भाजप), प्रवीण घुगे (भाजप बंडखोर), रमेश पोकळे (भाजप बंडखोर), नागोराव पांचाळ (वंचित), सतीश चव्हाण (राष्ट्रवादी),ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)

अमरावती शिक्षक पदवीधर मतदार संघातील लढत
श्रीकांत देशपांडे (शिवसेना), नितीन धांडे, दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती), संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समितीकडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण), प्रकाश काळबांडे
(विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

पुणे शिक्षक मतदारसंघातील लढत  
जयंत आसगावकर (काँग्रेस), उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)  
 (Edited  by : Mangesh Mahale)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख