महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त; शरद पवार 

काँग्रेसचे सरचिटणीसनेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
  Rajiv Satav .jpg
Rajiv Satav .jpg

पुणे : काँग्रेसचे सरचिटणीस (General Secreataty of Congress) नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. (NCP President Sharad Pawar paid tributes to Rajiv Satav) 

राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले होते मात्र, त्यांना इन्फेक्शन झाले असल्याने त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जालना येथे बोलताना दिली होती. सातव यांना शरिरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. त्यामुळे त्यांचे आज सकाळी जहांगीर रुग्णालयात निधन झाले. 

त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ट्वीट केले ते म्हणाले, ''काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!''

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, (Jayant Patil) यांनी ट्वीट केले आहे, ते म्हणाले की, ''सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. श्री. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली''.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, म्हणाल्या की,  ''काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते''. 

''निःशब्द! काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव जी यांचं कोरोनाने निधन झाल्याने अत्यंत दुःख झालं. एक युवा नेता काळाने आपल्यातून हिरावून नेला. सातव परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत! भावपूर्ण श्रद्धांजली!'' असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. 

''जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खा. राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.हिंगोली जिल्ह्यातील एका शहीद सैनिक पत्नीला सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून जमीन मिळावी यासाठी माझ्याशी संपर्क करून पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहास्तव विशेष बाब म्हणून त्या शहीद सैनिक पत्नीला आम्ही मदत केली. सामान्य माणसाच्या कामाची कणव राजीव सातवांच्या कामातुन दिसत असे'', असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, 19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. 25 तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सातव यांच्यावरील उपचारासाठी मदत केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com