...तेव्हा शरद पवारांनी पंतप्रधानांना दौरा रद्द करायला सांगितले होते  - NCP President Sharad Pawar announced help for flood victims-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

...तेव्हा शरद पवारांनी पंतप्रधानांना दौरा रद्द करायला सांगितले होते 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 जुलै 2021

पवार यांनी पुरात नुकसान झालेल्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'वेलफेअर ट्रस्टच्या' माध्यमातून मदत जाहीर केली.

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि लोकांना धिर देण्यासाठी दौरे केलेच पाहिजे. शासकीय यंत्रणा, कार्यकर्ते हे पूरग्रस्तांना (flood victims) मदतकार्य करत आहेत. त्यामुळे माझे आवाहन आहे की मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य नाही. ज्यांचा त्या भागात संबंध नाही त्यांनी दौरे टाळावेत, कारण नसताना दौरे करुन अडचण निर्माण करुन नये. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी केले. (NCP President Sharad Pawar announced help for flood victims) 

हेही वाचा : तळीयेचे पुनर्वसन करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे सरसावले...

पवार यांनी पुरात नुकसान झालेल्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'वेलफेअर ट्रस्टच्या' माध्यमातून मदत जाहीर केली. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, आम्ही सगळेच दौरे करायला लागलो तर शासकीय यंत्रणेवर दबाव येतो. त्यामुळे काम थांबते. माझ्यासारख्यानी दौरे टाळावे असे मला वाटते. यावेळी पवार यांनी आपण पंतप्रधानांनाही आपला दौरा रद्द करण्याची विनंती केली होती, असे सांगितले. ''माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूर भूकंप झाला त्यावेळचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. 

मला आठवते की, लातूरला असताना आम्ही कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव लातूरला पाहणीसाठी येणार होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला आणि सध्या येऊ नका अशी विनंती केली. दहा दिवसांनी या असे त्यांना म्हणालो. इथली यंत्रणा तुमच्याभोवती केंद्रीत होईल असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनीही तो दौरा रद्द केला, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : निर्बंध कमी करण्याबाबत दोन दिवसांनी मुख्यमंत्री निर्णय घेणार

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. सात जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार मदतीचे धोरण जाहीर करेल. पूरस्थितीचा अहवाल तयार करत अंतिम धोरण राज्यसरकार जाहीर करणार आहे. माळिनमध्ये अशी घटना घडली होती. माळिनचे पुनर्वसन करत राज्य सरकारने आदर्श निर्माण केला होता, असेही पवार यांनी सांगितले. 16 हजार कुटुंब उद्धस्त झाल्याची माहिती आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले आहेत. राष्ट्रवादीकडून 16 हजार किट तयार करण्यात आल्या आहेत. घरगुती भांडी, अंथरूण, मास्क, त्यामध्ये असेल, ही मदत स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून दोन दिवसात पोहचवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख