केंद्र विरुद्ध ट्विटर वादात नवाब मलिक यांची उडी

ट्वीटर हे एकच माध्यम राहिले होते जिथे लोक स्वतःची निर्भिड बाजू मांडत होते.
 Twitter .jpg
Twitter .jpg

मुंबई : केंद्र सरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले आहे. लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय. हे योग्य नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. (NCP National Spokesperson and Minorities Minister Nawab Malik criticizes the Central Government)  

ट्वीटर हे असे माध्यम होते ज्यावर लोक निर्भिडपणे आपली बाजू मांडत होते. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत होते. मात्र, ज्यापध्दतीने देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याचपध्दतीने ट्वीटरवर अंकुश ठेवला जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. 

ट्वीटर हे एकच माध्यम राहिले होते जिथे लोक स्वतःची निर्भिड बाजू मांडत होते. एखादा व्यक्ती चुकीची माहिती टाकत असेल किंवा खोटी अफवा पसरवत असेल तर आयटी सेलच्या विविध कलमान्वये त्यांच्यावर कारवाई होत होती, असेही मलिक यांनी सांगितले. ट्वीटरवर कुणाचा अंकुश नव्हता परंतु आता केंद्रसरकार थेट ट्वीटरवर अंकुश ठेवणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.  

 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती मलिक यांनी दिली. याबाबत मलिक यांनी खुलासा केला आहे.  

कालपासून प्रसारमाध्यमातून शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत आज नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com