भाजपला या बातमीने आनंद होणार नाही; पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये! - Ncp MLA Rohit Pawar criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

भाजपला या बातमीने आनंद होणार नाही; पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण केले होते.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Chief Minister Uddhav Thackeray) हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले. विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर  सतत होणाऱ्या टीकेवरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपला टोला लगावला आहे. (Ncp MLA Rohit Pawar criticizes BJP)

रोहित पवार यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. ट्वीटमध्ये पवार म्हणाले की ''उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही. पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषतः ज्या उत्तरप्रदेश सरकारचे भाजपकडून नेहमी गुणगान गायले जाते. तिथल्या मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये. 

हेही वाचा : बीएचआर घोटाळा; २० टक्के रक्कम भरण्याच्या अटीवर जामीन

'प्रश्नम' या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे महाविकास आघाडी सरकारचे यश आहे. 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची प्रतिक्षा 

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे. आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू, असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवले. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७, ५०० मतदारांना याबाबत आपली मते विचारण्यात आली. उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख