मोदी सरकार लोकांचे खिसे कापत आहे...नवाब मलिकांचा घणाघात...लूट थांबवा...

भारतातच पेट्रोल डिझेलचे दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे,
Sarkarnama Banner - 2021-05-10T144927.069.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-10T144927.069.jpg

मुंबई : "पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत आहे. हे पाकिटमार सरकार बनलेय," असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. 

आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत, असे सांगतानाच तेलाची लूट थांबवावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा : लोकसहभागातून उभारलेल्या 'सपकळवाडी मॅाडेल'चं ५९ ग्रामपंचायतींकडून अनुकरण...  
इंदापूर (पुणे) : संपूर्ण देशात सध्या कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसण्यापासून अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि नियमित पाठपुरावा केला तर कोणत्याही अडचणींवर सहज मात करता येते याचे उदाहरणच पुणे जिल्ह्यातील सपकळवाडी गावाने घालून दिले आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर तालुक्यात असलेलं सपकळवाडी हे अवघ्या दीड हजार लोकसंख्येचं गाव. कोरोनावर मात करण्यासाठी या गावाने सुरू केलेला उपक्रम अत्यंत आदर्शवत ठरत आहे. सध्या आजूबाजूच्या गावांनी सुद्धा त्यांचे अनुकरण सुरू केले आहे. आतापर्यंत ५९ ग्रामपंचायतींनी संपर्क करत येथील मॉडेल स्वीकारले आहे.  खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्धघाटन राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com