मुंडे आणि चाकणकरांनी पडळकरांना धुतले...

सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!, अशी खोचक टिप्पणी धनजय मुंडे यांनी पडळकर यांच्याबाबत केली आहे.
dhanjay-chakankar24
dhanjay-chakankar24

पुणे : राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 'राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची,' हे समजून अनेकजण 'उचलली जीभ लावली टाळ्याला' या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!, अशी खोचक टिका सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांनी पडळकर यांच्याबाबत केली आहे. गोपीचंद पडळकर यांना मानसोपचारांची गरज आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.

पडळकर यांनी आज शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्याला उद्देशून चाकणकर यांनी हे प्रत्युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांनी पडळकर यांच्यासारखा व्हायरस बाजूला ठेवला त्याबद्दल बारामतीकरांचे आभार असा टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे.  

आज पवार यांच्यावर टीका करून पडळकर यांनी आपली वैचारिक पातळी दाखवून दिली आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे तेवढी पवार यांची राजकीय कारकीर्द आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे. बारामतीत जप्त झालेले डिपॉझिट आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे पडळकर यांनी हे हीन दर्जाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, हेच दिसून येते. त्यामुळे त्यांनी मानसोपचार करून घ्यावेत, असेही चाकणकर यांनी सांगितले आहे. यापुढे पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. 

पंतप्रधान मोदी जेव्हा बारामतीला येतात तेव्हा ते पवार यांच्या कार्याची स्तुती करतात, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. कारण भाजपाची असभ्य संस्कृती पडळकर यांनी फार लवकर आत्मसात केली आहे, असाही टोला श्रीमती चाकणकर यांनी लगावला आहे. पंढरपूर येथे बोलताना पडळकर यांनी हे वक्तव्य केले होते. त्याविरोधात युवक राष्ट्रवादीने पडळकरांच्या तोंडाला काळे फासून त्यांना चोप देणार असल्याचा इशारा दिला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर हे राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते.

पवारांवर टीका केली की मोठे होता येते, असा भाजपमधील मंडळींचा समज झाला आहे. त्यातून अशी वक्तव्ये येतात. मात्र पडळकरांना त्याच्या राजकीय परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पडळकर यांनी काल बारामतीत बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात परिवर्तन करणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ते बुधवारी पंढरपुरात पोहोचले आणि खालच्या पातळीवर पवारांवर टीका केली. 

हेही वाचा : भाजप व्हर्च्युल रॅलीः शिवसेना म्हणते गरज होती का?  

औरंगाबाद : औरंगाबादेत भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्हर्च्युल रॅलीत सहभागी होण्यासाठी आयोजन केले होते. सोशल डिस्टनन्सच्या नियमाला हरताळ फासून एकाच ठिकाणी गर्दी केल्याचा आरोप त्यांच्यावर शिवसेना व एमआयएमकडून होत आहे. कोरोनाच्या संकटात अशा रॅलीची गरज होती का? असा सवाल शिवसेनेने, तर नियमांची पायमल्ली झाली असेल तर पोलिस आणि प्रशासनाने संबंधित भाजपच्या संयोजकांवर कुणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी अशी मागणी एमआयएमने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com