राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांचा कट  

शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध आहे.
034Sarkarnama_20Banner_20_202021_05_13T145602.918.jpg
034Sarkarnama_20Banner_20_202021_05_13T145602.918.jpg

मुंबई : ''आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  व परिवाराच्या बाबतीत ज्यापध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे आहे,'' असेही नवाब मलिक म्हणाले. NCP leader Nawab Malik criticizes BJP

''साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. ज्या काही कायदेशीर कारवाई आहेत ते ईडी करत असेल. परंतु अजित पवार व त्यांच्या परिवारातील कुणीही बेकायदेशीर कामे केलेली नाहीत,'' अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही
मराठा आरक्षणाबाबत नवाब मलिक म्हणाले की, केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर घटना दुरुस्ती करुन राज्यांना अधिकार द्यावे. राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण निश्चित रुपाने देईल.  सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकारने केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. आम्ही आधीपासूनच कलम १०२ मधील घटना दुरुस्ती झाल्यानंतर सर्व अधिकार हे केंद्रसरकारकडे आहेत. मराठा आरक्षण असेल किंवा एसबीसी कॅटेगरीतील आरक्षण असेल हे देण्याचा अधिकार राज्यांना राहिलेला नाही. त्यासाठीच राज्य सरकारने केंद्रसरकारकडे अधिकार देण्याची मागणी केली आहे.  ''घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले तर राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण असतील त्याबाबतीत निर्णय घेऊ शकते परंतु घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही,'' असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार 
केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्यात येणार आहे आणि तिन्ही पक्षांची तीच भूमिका आहे, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कृषी कायदा होताना शेतकरी विरोधात कुठलाही कायदा होणार नाही ही तिन्ही पक्षांची भूमिका आहे. याबाबत शरद पवार यांनीही कृषी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचेही मलिक यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com