धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे.. 

मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती.
dm22f.png
dm22f.png

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. ही तक्रार त्या महिलेने मागे घेतली आहे. या प्रकरणाचे राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे या महिलेने सांगितले. मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

मुंडे यांच्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बैठकही घेतली होती. मात्र, भाजप नेते हेगडे यांच्या आरोपानंतर या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची धार काहीशी बोथट झाली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ सदस्यांना याबाबत विश्वासात घेणार आहे. या सर्व वरिष्ठ सदस्यांची मते जाणून घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही काळजी घेऊ, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. पण त्यानंतर मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या.

त्याबाबत पवार यांनी आपली भूमिका मांडली. हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान आपण केले होते, त्याबाबत आता नवी माहिती प्रश्न निर्माण करणारी आहे. काही तक्रारी लक्षात घेता, यात नक्की काय घडले याचा विचार करायला हवा, असेही पवार म्हणाले होते. 

पहिल्यांदा जी तक्रार होती ती अत्याचार केल्याची तक्रार होती. मिडियातून बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. मुंडे यांनी आम्हाला जे सांगितले होते की काही दिवसांपूर्वी ब्लॅकमेल होत असल्याची शंका होती. ते स्वतः कोर्टात गेले. त्या आॅर्डर्स आम्हाला दाखवल्या. याचा अर्थ असे काही होणार याची पूर्ण कल्पना त्यांना होती, असे पवार यावेळी म्हणाले.

ते म्हणाले, "जी व्यक्ती स्वतःहून कोर्टात जाते याचा अर्थ तिला स्वतःवर विश्वास आहे. कोर्ट काय ते ठरवेल. मी यात बोलणार नाही. आणखी एका व्यक्तीला अशाच प्रकारे त्रास देण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला. ही बातमी एका भाजपच्या माजी आमदाराकडून आली होती. ही माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर आणखी एका व्यक्तीचे स्टेटमेंट आले. एका विमान कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार आली. आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या संबंधात तीन व्यक्तींकडून त्रास देण्याच्या तक्रारी आल्या आहेत. हे जेव्हा आम्हाला समजले तेव्हा आम्ही निष्कर्ष काढला की सखोल चौकशी झालीच पाहिजे. ती चौकशी आम्हाला खात्री आहे की पोलिस ते करतील,''

''पोलिस प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पण एक गोष्ट सुचवली की एसीपी लेव्हलची महिला अधिकारी ठेवा. अन्य तक्रारींचीही माहिती घेणे व त्यातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची भूमिका आहे. काल बाकीचे चित्र माझ्याकडे नव्हते. एका भगिनीच्या तक्रारीची नोंद आम्हा सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना घेतली पाहिजे. म्हणून मी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले. मात्र, थेट कुठल्या निष्कर्षाप्रत येण्याने कुणावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही,'' असेही पवार म्हणाले.

Edited  by : Mangesh Mahale 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com