गोव्याच्या बीचवर रंगीबेरंगी कपड्यातील फडणवीस म्हणतात, मी पुन्हा येईन!

महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता.
NCP leader Clyde Crasto criticized Devendra Fadnavis
NCP leader Clyde Crasto criticized Devendra Fadnavis

मुंबई : पुढील वर्षी गोवा विधानसभेची (Goa Election) निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी भाजपनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वीही फडणवीस यांनी गोव्याच्या निवडणुकांमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर भाजपला पुन्हा सत्ता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यावरून गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या कुंचल्यातून फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. (NCP leader Clyde Crasto criticized Devendra Fadnavis)

महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण सत्ता काबीज करता आली नाही. त्यानंतर 'मी पुन्हा येईन' यावरून फडणवीस यांना विरोधकांकडून सतत डिवचलं जातं. गोव्याच्या राजकारणातही आता 'मी पुन्हा येईन'वरून फडणवीसांना लक्ष्य करण्यात आलं आहे. 

क्लाईड क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीस यांना टोला लगावला आहे. गोव्याच्या बीचवर पर्यटकाच्या रंगीबेरंगी वेशभुषेत उभे असलेल्या फडणवीस यांनी हातात 'मी पुन्हा येईन' असा फलक घेतल्याचे चित्र त्यांनी रेखाटलं आहे. या चित्रामध्ये 'आव गोयंचो सायबा' असंही त्यांनी म्हटलं आहे. 

फडणवीस गोव्यात 'फक्त पर्यटन' करुन पुन्हा महाराष्ट्रात परतणार, अशा आशयाचं हे व्यंगचित्र आहे. यातून क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांची 'सुप्त इच्छा'च समोर आणली आहे. गोव्यातही ते 'मी पुन्हा येईन'चा गजर करत असल्याचे सांगत क्रास्टो यांनी जणू महाराष्ट्रात हातातून निसटलेल्या सत्तेची आठवण करून दिल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, गोव्यात यापूर्वी काम केलं आहे. मुख्यमंत्री व मंत्रीमंडळानं केलेल्या कामांच्या जोरावर भाजपला पुन्हा सत्ता मिळेल. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे या निवडणुकीत आमच्या सोबत नसतील. पण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जात आम्ही गोव्यात भाजपची सत्ता आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com