रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले! 

बिहार व उत्तर प्रदेश सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
 Nawab Malik,  Narendra Modi .jpg
Nawab Malik, Narendra Modi .jpg

मुंबई : कोरोनोमुळे (Corona) होणारा मृत्यूदर रोखण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे. बिहार (Bihar) व उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत येत असून कोरोनाबाधित रुग्णांचे असावेत, असा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे. 'जवळपास 40 ते 50 मृतदेह तरंगताना दिसले,' असे चौसा येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी घडलेल्या प्रकारावरून भाजपवर टीका केली आहे. (NCP leader and Minorities Minister Nawab Malik criticizes the central government)

या संदर्भात नवाब मलिक यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, ''रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले'', अशी टीका मलिक यांनी केली. आरजेडीनेते तेज प्रताप यादव यांचे ट्विट रीट्विट करत मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रकरण काय? 

बिहार व उत्तर प्रदेश सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत येत असून कोरोरनाबाधित रुग्णांचे असावेत, असा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे. 'जवळपास 40 ते 50 मृतदेह तरंगताना दिसले,'  हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या भागात 100 हून अधिक मृतदेह वाहत आले असावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

मृतदेह मागील पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याचे दिसते. आम्ही ते मृतदेह पुरत आहोत. हे मृतदेह कुठून आले याचा शोध घेण्याची गरज आहे. वाराणसी, अलाहाबाद की अन्य कोणत्या ठिकाणांहून आले हे शोधावे लागेल, असे के. के. उपाध्याय या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे मृतदेह येथील नाहीत. याठिकाणी मृतदेह नदीत सोडण्याची परंपरा नाही, असेही ते म्हणाले. लोकांना नदीतील पाणी आणि मृतदेहांमुळे संसर्गाची भीती वाटत आहे. हे मृतदेह आम्ही पुरत असल्याचे नरेंद्र कुमार या स्थानिकाने सांगितले.

दरम्यान, यावरून आता बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू झाली आहे. शनिवारीही यमुना नदी पात्रामध्ये अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. काँग्रेसने यावरून सरकारवर टीका केली आहे. नदीत आढळून आलेले मृतदेह हे कोरोनाच्या लपवलेल्या मृत्यूचे पुरावे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. देशात मागील काही दिवसांपासून दररोज चार हजार मृत्यू कोरोनामुळे होत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com