मुंबई : "आपल्या फोनवरील व्हॉटसएपचे संभाषण टॅप होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल केला होता. 'महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा फोन टॅप होणे, ही गंभीर बाब आहे, याची चौकशी करावी,' अशी विनंती आव्हाड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
आपला फोन टॅप होत असल्याचा आरोप काल मध्यरात्री आव्हाड यांनी टि्वट करून केला होता, त्यानंतर राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली होती. या फोनटॅपची चैाकशी करण्याची विनंती आव्हाडांनी आज देशमुखांकडे केली आहे. आव्हाडांच्या फोन टॅपची चौकशी देशमुख करतील का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
‘मला माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीजकडून माझ्या व्हॉट्सअॅपवरही नजर राखली जात असल्याचं मला वाटत आहे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. आव्हाडानी फोन टॅप होत असल्याची चैाकशी करावी, अशी विनंती गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली असली तरी त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे आव्हाडांचा रोख कोणाकडे आहे, याबाबत सध्या राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
पन्न्नास फूट उंच पाळण्यातून हे मंत्री करतात जनतेचा न्यायनिवाडा... https://t.co/XosiheFLEj
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 22, 2021
खासदार संजय राऊत यांनी सुद्धा 24 जानेवारी 2020 रोजी आपला फोन टँप होत असल्याची तक्रार केली होती. राऊतांनी भाजपच्याच एका माजी मंत्र्याकडून त्यांचा फोन टॅप होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिले होते. आता आव्हाडाच्या फोन टँपची चैाकशी होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : छगन भुजबळ कोरोनाग्रस्त; साहित्य संमेलनाचे काय होणार ?
नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भुजबळ नाशिक येथे होणा-या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाच्या तयारी संदर्भात ते सातत्याने बैठका व तयारीसाठी कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. या धावपळीत त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने गेल्या दोन तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते, नागरिकांनी आपली चाचणी करुन घ्यावी. तसेच संपर्कातील सहका-यांनीही दक्षता घ्यावी, असे पत्रक त्यांच्या कार्यालयाने काढले आहे.

