गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी नयना खांडेकर यांची नियुक्ती - Nayana Khandekar District Collector Gondia | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी नयना खांडेकर यांची नियुक्ती

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

माजी सैनिक कुटुंबातील कन्या असल्यामुळे त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सोलापूर : राज्यातील प्रशासकीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्याही बदलल्याचे सञ सुरू झाले आहे. या बदल्यांमध्ये मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. राज्य सरकारने काल 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. Nayana Khandekar District Collector Gondia

माजी सैनिक मेजर शंकरराव खांडेकर यांची कन्या नयना खांडेकर-गुंडे Nayana Khandekar यांनी गोंदियाच्या  Gondia जिल्हाधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. धनगर समाजातील पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून त्या काम पहात आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल आजपर्यंत विविध स्तरावरील अनेक पुरस्कार व पदके मिळालेली आहेत.

एका सर्वसामान्य माजी सैनिक कुटुंबातील कन्या असल्यामुळे त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कंदलगाव येथील इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बिराप्पा शेजाळ, सचिवा आकांक्षा शेजाळ यांनी त्यांचा सत्कार केला.  Nayana Khandekar District Collector Gondia

प्रशासकीय सेवेमध्ये सन 1992 मध्ये पहिल्यांदा उपजिल्हाधिकारी म्हणून त्या सेवेत रुजू झाल्या. यानंतर त्यांनी उस्मानाबाद, कुर्डूवाडी, सोलापूर, सांगली, नाशिक येथे उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तर पुण्यात पीएमपीएमएलच्या प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. आता जिल्हाधिकारी म्हणून गोंदिया येथे पदभार स्वीकारला आहे.   

बिनवाडे पुण्याचे नवे अतिरिक्त आयुक्त
पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे हे नवे अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. राज्य सरकारने काल (ता. १३) सायंकाळी हे बदलीचे आदेश काढले. रुबल अग्रवाल या १ जानेवारी २०१९ पासून पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. पुण्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना त्यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख