बंगालच्या जनतेने भाजपला नाकारले आता अमित शहा यांनी राजीनामा द्यावा!  - Nawab Malik's criticism of Amit Shah | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

बंगालच्या जनतेने भाजपला नाकारले आता अमित शहा यांनी राजीनामा द्यावा! 

 अभिजीत घोरमारे  
सोमवार, 3 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षापासून अमित शहा आभास निर्माण करून नेहमीच आकडे फेकून अबकी बार दो सौ के पार असे म्हणत होते. 

गोंदिया : पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला नाकारत पुन्हा एकदा  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. मात्र, बंगालमधील निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले, देशातील कोरोनाच्या परिस्थिती वरुन ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्या अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी शहा म्हणालो होते की, जेव्हा जनता आम्हाला राजीनामा मागेल तेव्हा आम्ही देऊ. त्यामुळे बंगालच्या जनतेने भाजपला नाकारले आहे. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागीतला आहे. त्यामुळे अमित शहा यांनी आता राजीनामा द्यावा, असे मलिक म्हणाले.

हे ही वाचा :  शरद पवार म्हणाले, हा तर रडीचा डाव!

पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षापासून अमित शहा आभास निर्माण करून नेहमीच आकडे फेकून अबकी बार दो सौ के पार असे बोलून, फेकाफेकीचे राजकारण करतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहीजे. गुजराती लोक जसे आकडे फेकतात, तसे आकडे फेक शहा करत होते. ते प्रत्येकवेळी आकडे फेकतात पण त्यांचा एकही मटका लागत नाही, अशी टीका मलिक यांनी केली. 

यावेळी मलिक यांनी पंढरपूर पोटनिवणुकीवर भाष्य केले ते म्हणाले की, ''पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला असून ही निवडणुक हरल्यानंतर यानिवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका राष्ट्रवादी दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेल, असेही मलिक यांनी सांगितले.

हे ही वाचा :  रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी बनली आमदार!
 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला केवळ ७७ जागांवर समाधान मानवे लागले आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना मात्र एकही जागा मिळालेली नाही. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार केला होता. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख