दिपाली चव्हाण यांच्या हत्येत नवनीत राणा अप्रत्यक्ष सहभागी आहेत का ?..चाकणकरांचा आरोप - Navneet Rana indirectly involved in Chavan murder Rupali Chakankar | Politics Marathi News - Sarkarnama

दिपाली चव्हाण यांच्या हत्येत नवनीत राणा अप्रत्यक्ष सहभागी आहेत का ?..चाकणकरांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

रुपाली चाकणकर यांनी चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना धारेवर धरले आहेत.  

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी काल हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना धारेवर धरले आहेत.  

दिपाली चव्हाण यांच्या सूसाईट नोटमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नावाचा उल्लेख आहे. चव्हाण यांनी आपल्या होत असलेल्या त्रासाबाबत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.  

आपल्या टि्वटमध्ये चाकणकर म्हणतात, "जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो. महिला लोकप्रतिनिधी म्हणून दिपाली चव्हाण यांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का?

दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. 

"माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी शेवटची इच्छा आहे," असे दिपाली चव्हाण यांनी सूसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. "माझे रोखलेले वेतन माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला द्या, विनोद शिवकुमार यांच्याबाबत आपल्याकडे खूप तक्रारी आहेत. त्या गांर्भीयाने घ्या," असे चव्हाण यांनी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  
  
"शिवकुमार यांच्याकडे काही जणांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या. त्याची शहानिशा न करता शिवकुमार मला निंलबित करण्याची धमकी देत होते. माझ्याकडे तीन गावांच्या पूऩर्वसनाचे काम होते. या कामाविषयी माझी बाजू ते ऐकून न घेता. ते मला शिवीगाळ करीत होते. मागील आठवड्यापासून ते वारंवार हरिसाल येथे येत आहेत. मला खूप वाईट बोलतात. यांचा मला खूप मानसिक त्रास होत आहे," असे चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख