अजित डोवाल यांच्या जीवाला धोका

अजित डोवाल यांना ठार मारण्याचे षडयंत्र पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ajit13.jpg
ajit13.jpg

नवी दिल्ली : उरी आणि बालाकोट स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ठार मारण्याचे षडयंत्र पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने त्यांना मारण्याची कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे. 

अजित डोवाल यांचे कार्यालय सरदार पटेल भवनमध्ये आहे. या कार्यालयाची टेहळणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशी करण्यात आली, यातून सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. अजित डोवल यांच्या कार्यालयाचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे आढळले होते. त्यांना ठार करण्याचे षडयंत्र राचल्याचे उघड झाले आहे. 

जैशचा दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिक याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील हँडलरच्या सांगण्यावरुन हे सर्व केल्याचे जैशच्या दहशतवाद्याने सांगितले. २०१६ उरी सर्जिकल स्ट्राइक त्यानंतर २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राइक करण्यात आले. तेव्हापासून अजित डोवाल पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत. 


हेही वाचा : राज्यपालांनी शहाण्यासारखे वागावे..भाजपच्या अजेंड्यावर नाचू नये...

 
मुंबई : राज्यपालांचा दौरा खासगी स्वरूपाचा होता. त्यामुळे नियमाने सरकारी विमानाचा वापर करता येणार नाही, असे कळवूनही राज्यपाल विमानात बसले. राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून विचारण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com