नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, सगळ्यांचा हिरमोड होईल : चंद्रकांत पाटील 

भाजपचे नुकसान होईल, असे खडसे वागणार नाहीत.
Nathabhau will not go anywhere, everyone will be upset : Chandrakant Patil
Nathabhau will not go anywhere, everyone will be upset : Chandrakant Patil

पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा खंडन केले आहे. नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, सगळ्यांचा हिरमोड होईल, असेही पाटील यांनी पुण्यात बोलताना सांगितले. 

गेल्या महिनाभरापासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबतच्या बातम्या येत आहेत. खडसे हे 17 ऑक्‍टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. मात्र, नाथाभाऊंनी त्याचा इन्कार करत माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे मुहूर्त हे माध्यमांनीच काढले होते, असे म्हटले होते. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख जळगावच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी शासकीय विश्रामृहात देशमुख आणि खडसे यांच्यात चर्चा झाली होती. शिवाय, देशमुखांच्या गाडीतून खडसे यांनी प्रवासही केला होता. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीला प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. 

त्यानंतर खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त रविवारी आले होते. त्या वेळी त्यांनी आपण अजूनही भाजपत असून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगितले होते. तसेच, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनीही अजूनपर्यंत माझ्याकडे कोणाचाही राजीनामा आलेला नाही. तसेच, नाथाभाऊ पक्ष सोडून जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले. ते म्हणाले की एकनाथ खडसे कुठेही जाणार नाहीत, सगळ्यांचा हिरमोड होणार आहे. भाजपचे नुकसान होईल, असे खडसे वागणार नाहीत. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला एकनाथ खडसे उपस्थित होते, असेही पाटील यांनी नमूद केले. 

दरम्यान, एकनाथ खडसे नाराज असतील. त्यांची नाराजी दूर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नाथाभाऊ पक्षात पुन्हा सक्रिय होतील, असा आशावादही आमदार चंद्रकांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com