सरकारच्या बेजबाबदारपणामुळे नाशिकची दुर्घटना :  प्रकाश आंबेडकर  - Nashik Oxygen Tank Leakage due to irresponsibility of government Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारच्या बेजबाबदारपणामुळे नाशिकची दुर्घटना :  प्रकाश आंबेडकर 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

हा मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अकोला : नाशिकमधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

ऑक्सिजन पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत सर्व कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आली असल्याची माहिती ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ते म्हणाले की टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरत असताना वॉल बंद करण्यात आला होता तो बंदच राहिला. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. हा मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सरकारचा हा दुर्लक्षपणा असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली.  या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर शासन कारवाई करेल अशी अपेक्षा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

तुकाराम मुंढे म्हणाले, "नाशिकची घटना सुन्न करणारी'  

नाशिक : ऑक्‍सिजन टॅंकचा पाईप तुटल्याने पुरवठा बंद होऊन महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणारे चोविस रुग्ण दगावले. या घटनेसंदर्भात चर्चीत सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ट्‌विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, ही घटना मन सुन्न करणारी आहे. 

मुंढे म्हणाले, "नाशिकची घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. दुर्दैवी व वेदनादायक घटनेने मन सुन्न झाले. मी निशब्द झालो. सर्व रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्री. मुंढे यांचे ट्विट सर्वदूर रिट्विट करण्यात आले आहे. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात काल साडे बाराला ऑक्‍सिजनच्या टाकीच्या कॉकला तडे गेले. त्याने ऑक्‍सिजन रिफीलींग करताना गळती झाली. त्यात रुग्णालयाचा ऑक्‍सिजनचा पुरवठा दिड तास बंद पडला. त्यात चौविस रुग्णांचे प्राण गेले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख