मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना जाणूनबुजून टाळलं.. - Narendra Patil reaction regarding the meeting between Udayan Raje and Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना जाणूनबुजून टाळलं..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

महाविकास आघाडी सरकारनं कुठल्याच विषयावर ठोस पावलं उचलली नाही.

पुणे : मराठा आरक्षणासाठी उदयनराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती यांची आज पुण्यात भेट झाली. यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "संभाजी राजे मराठा आरक्षणाचा योग्य पाठपुरावा करीत आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यास गेले होते. त्यावेळी त्यांनी संभाजीराजेंना सोबत घेऊन जायला पाहिजे होतं, पण मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना जाणूनबुजून टाळलं," असा आरोप नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी केला आहे. Narendra Patil reaction regarding the meeting between Udayan Raje and Sambhaji Raje

नरेंद्र पाटील म्हणाले, "उदयनराजे आणि संभाजी राजे यांची बैठक पुण्यात झाली. त्यातून मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी राजेंची मागणी पूर्ण केली. पण महाविकास आघाडी सरकारनं कुठल्याच विषयावर ठोस पावलं उचलली नाही. मराठा समाजाला आरक्षण न देण्याबाबतचा  महाविकास आघाडीचा मानस आहे. आघाडी सरकारने मराठा समाजासाठी ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्या बंद केल्या आहेत.  त्या पून्हा सुरू कराव्यात."

"महाविकास आघाडी सरकारनं अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला योग्य मदत दिली जात नाही. पंजाबराव देशमुख वसाहतीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राखीव ठेवल्या होत्या. ते काम अजून सुरू नाहीत," अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली आहे. 

``दोन्ही छत्रपती घराण्याचा मोठा वारसा आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. मी  छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली. सगळ्या विषयांवर आमचे एकमत आहे. काही दुमत नाही. एकमताने आम्ही काम केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही एकत्र काम करू,`` अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.  त्यांनी आज उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीची राज्याच्या राजकारणात उत्सुकता होती. दोन्ही खासदारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.    

संभाजीराजे म्हणाले की, आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. त्यामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुरुस्ती याचिका करणे, असे हे दोन पर्याय आहेत  मात्र, भोसले समितीने सांगितल्यानुसार आपल्याला दुरुस्ती याचीका दाखल करण्याची गरज नाही. आपल्याला मागासवर्गीय आयोग स्थापन करुन राज्यापालांकडे जावे लागणार आहे. त्यानंतर राज्यपाल तो अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करतील आणि नंतर तो अहवाल केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाईल.  
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख