मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना नरेंद्र पाटलांचा सवाल, म्हणाले.. - Narendra Patil question to Sharad Pawar about Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना नरेंद्र पाटलांचा सवाल, म्हणाले..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

आंदोलनास राजकीय वास येतो की काय अशी शंका‌ आहे.

पंढरपूर : ''मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मराठा नेत्यांमध्ये फूट पडलेली नाही, पण पुढे कोण येते हे महत्वाचे आहे. सत्ताधारी पक्ष यातून पाय काढतो आहे. तो कुणाच्या तरी मागे लपतो आहे. गेल्यावेळी मराठा क्रांती मोर्चा निघाला होता तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक मोर्चात एकाच वेळी सहभागी झाले होते. पण आता या प्रश्नी सत्ताधारी पक्ष मोर्चा काढण्यासाठी बाहेर पडत नाही,'' असा आरोप  माजी आमदार,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज केला. ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. Narendra Patil question to Sharad Pawar about Maratha reservation
 
नरेंद्र पाटील म्हणाले,  ''शरद पवार देशाच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जातात, असा कुठलाही प्रश्न नाही, जो त्यांना माहित नाही, सर्व प्रश्न त्यांना माहित आहे. ते प्रश्न सोडवू शकतात. पण मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ते इतके उदासीन का ?  राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठा आमदारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. मागील वेळी सर्व समाजाने  एकत्रित ‌ येऊन आंदोलने केली.  पण या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ने सोयीस्करपणे आंदोलनास बगल दिली आहे. या आंदोलनास राजकीय वास येतो की काय अशी शंका‌ आहे. समाजाला एकत्र करून आमची ही  सरकार विरोधातील  आरक्षणाची लढाई सुरूच ठेवणार आहे.''

''राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळख आहे, सर्वाधिक आमदार- खासदार मराठा समाजाचे आहेत. मराठ्यांचा वापर फक्त मतदाना करता करायचा का त्यांच्या मुलांना यूपीएससी एमपीएससी करून शिकवायचं आहे हे आता त्यांनी ठरवावं,'' असे नरेंद्र पाटील म्हणाले.  

उद्धव काका, आमचं शिक्षण कधी सुरु होणार?
मुंबई : शुल्क न भरल्यामुळे मुंबईतील वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ४०० मुलांचे आँनलाइन शिक्षण बंद करण्यात आले आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं.  
 Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख