नरेंद्र मोदींनी मोडला पंडित नेहरूंचा विक्रम.... - Narendra Modi turns to Pandit Nehru record  | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदींनी मोडला पंडित नेहरूंचा विक्रम....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या विक्रमामुळे मोदी यांनी पंडित  नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम मोदी यांच्या नावावर आहे. आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या विक्रमामुळे मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला आज 20 वर्षे पूर्ण झाली. वीस वर्षाच्या कार्यकाळात मोदींनी गुजराथचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक दिवस म्हणजे 6 हजार 941 दिवस राहण्याचा विक्रम केला आहे. पंतप्रधानपदावर 6 हजार 130 दिवस राहण्याचा विक्रम यापूर्वी जवाहर नेहरू यांनी केला होता. मोदींनी नेहरूंचा हा विक्रम मोडला आहे. त्यानंतर इंदिरा गांधी (5 हजार 829 दिवस), मनमोहन सिंह (3556 दिवस), मोरारजी देसाई (मुख्यमंत्री आणि पंतप्रधान 2511 दिवस), अटल बिहारी वाजपेयी (2272 दिवस), पी.व्ही. नरसिंह राव (मुख्यमंत्री आणि पंतप्रधान 2229 दिवस), राजीव गांधी (1857 दिवस), व्ही. पी. सिंग (मुख्यमंत्री आणि पंतप्रधान 1082) तर सवाधिक कमी कार्यकाळ गुलझारीलाल नंदा (26 दिवस) हे पंतप्रधानपदावर राहिले. 

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम मोदी यांच्या नावावर आहे. ते 4 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 या काळात मुख्यमंत्रिपदी होते. त्यानंतर 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी राज्यातून देशाच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून सुरू असलेली त्यांची विजयी घोडदौड कायम आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळून मोदी पंतप्रधान बनले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळून ते पुन्हा पंतप्रधान बनले.  

अटलबिहारी वाजपेयी हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पदावर राहणारे बिगरकाँग्रेसी पंतप्रधान होते. वाजपेयी सुरुवातीला 1996 मध्ये 13 दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात 1998 ते 2006 या काळात वाजपेयी हे 2 हजार 256 दिवस पंतप्रधानपदी होते. 
 
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम मोदी यांच्या नावावर आहे. ते 4 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 या काळात मुख्यमंत्रिपदी होते. त्यानंतर 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी राज्यातून देशाच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून सुरू असलेली त्यांची विजयी घोडदौड कायम आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळून मोदी पंतप्रधान बनले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळून ते पुन्हा पंतप्रधान बनले. अटलबिहारी वाजपेयी हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पदावर राहणारे बिगरकाँग्रेसी पंतप्रधान होते. वाजपेयी सुरुवातीला 1996 मध्ये 13 दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात 1998 ते 2006 या काळात वाजपेयी हे 2 हजार 256 दिवस पंतप्रधानपदी होते. 

Edited  by : Mangesh Mahale 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख