गोरगरीब, दलित, आदिवासींसाठी आपले सरकार काम करतंय, नरेंद्र मोदींचा दावा  - Narendra Modi claims that his government is working for the poor, dalits and tribals | Politics Marathi News - Sarkarnama

गोरगरीब, दलित, आदिवासींसाठी आपले सरकार काम करतंय, नरेंद्र मोदींचा दावा 

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं.

मनाली (हिमाचल प्रदेश) : "" आपले सरकार गोरगरीब, दलित, आदिवासी आणि वंचित समाजासाठी काम करीत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गेल्या साठ वर्षात ज्या अठरा हजार गावात वीज नव्हती त्या गावात आता प्रकाश पडला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदी म्हणाले, की केंद्रात आपले सरकार आल्यापासून देशाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील आदिवासी, गरीब, दलित, विंचत समाजासाठी काम करीत आहे. स्वातंत्र्याला सात दशकं उलटल्यानंतरही देशातील 18 हजार गावात साधी वीजही पोचली नव्हती. पण, अशा गावात आपल्या सरकारने वीज नेली आहे. त्या गावांना विजपुरवठा करण्यात आला आहे.

तसेच गावात शौलालये, स्वंयपाकासाठी गॅस कनेक्‍शनही देण्यात आले आहे, गरीबांवर चांगले उपचार व्हावे म्हणून पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्यासाठी सेवा देण्यात येत आहेत. 

हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी होईल असंही त्यांनी सांगितलं. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.

तसेच देशातील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहेत. कोरोनाच्या संकटात सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी तोंडाला मास्क लावा, हातपाय स्वच्छ धुवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले आहे. 

हे ही वाचा : 
संजय राऊतांचा योगींवर निशाणा 

"" मला समजत नाही बुलगढी (जि, हाथरस, यूपी) गावात जाण्यापासून मीडियाला का रोखले ? जर सरकारने कुठलीही गोष्ट चुकीची केली नसेल तेथे मीडियाला जावू द्यायला हवे होत.े जे काही तथ्य आहे ते बाहेर आले असते असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे. 

हाथरसप्रकरणावरून देशभर वातावरण तापले आहे. कॉंग्रेससह देशभरातील लहानमोठ्या पक्षांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. शिवसेने तर आज मुंबईत योगी सरकारच्या निषेधार्थ आंदोलनही केले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मीडियाची बाजू घेत बुलगढी गावात मीडिया का जावू दिले नाही असा सवाल केला आहे. तसे ट्विट राऊत यांनी केले आहे. 

शिवसेना इतक्‍यावरच थांबली नाही तर आजच्या आपल्या मुखपत्रात योगी सरकारचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो घेतला आहे."" ए अबले, माफ कर! हे तुमचे हिंदुत्व' या शीर्षकाखाली लिहिलेल्या संपादकीयमध्ये उत्तरप्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. 

योगी सरकार आणि भाजपला जबरदस्त टोले लगावताना या अग्रलेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावे शंख फुंकत होता, मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे ? मुंबईत एका नटींचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून कर्कश मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत ? असा सवालही केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख