शरद पवार, संजय राऊत यांच्यानंतर आता हे नेते राज्यपालांच्या भेटीला...

राज्यपालांच्या भेटीसाठी सध्या अनेक नेते जात आहेत...काय कारण असावे?
narayan rane
narayan rane

पुणे : महाराष्ट्रातील कोरोनाचा मुकाबला करण्याच्या विषयावरून राज्य व केंद्रसरकारमध्ये वाद सुरू आहे. कोरानाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करून भाजपकडून नुकतेच 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनही करण्यात आले होते. यावरून महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राजभवनात सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल्यांच्या भेटीस गेले, या भेटीवरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. नेमके या भेटीत काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष आहे.  त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सायंकाळी पाच वाजता राज्यपालांना भेटणार आहेत.

शरद पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच भेटीचे निमंत्रण दिले असल्याचे समजते. राज्यपाल्याच्या विनंतीला मान देऊन शरद पवार राजभवनात दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यपालांना भेटले. त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे संंबंध पितापुत्रासारख असल्याचे सांगितले. त्यानंतर राऊत यांनी `सामना`च्या आजच्या अग्रलेखात पुन्हा राज्यपालांवर टीका केली.

भाजपचे नेते हे कोरोनाच्या मुद्यावरून राज्यपालांना भेटतच आहेत. त्यात नारायण राणे यांचा त्या शिष्टमंडळात समावेश नव्हता. राणे हे स्वतंत्रपणे राज्यपालांना भेटत आहेत. 

दोन दिवसापासून श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री पियुष गोयल, खासदास संजय राऊत यांनी याबाबत टि्वट करून संघर्ष सुरू झाला आहे. राज्य सरकारच्या नियोजनाअभावी गेल्यावेळी रेल्वेला ६५ ट्रेन रद्द कराव्या लागल्या होत्या, असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला होता. 

मात्र, राज्य सरकारने आपण रेल्वेला सर्व मजुरांची यादी आणि तपशील दिल्याचा दावा केला आहे. मात्र, पियुष गोयल यांनी आपल्याला ही यादी मिळाली नसल्याचे सांगितले आहे.  या मुद्दावर राज्यपाल आता शरद पवार यांच्याकडे काय सूचना करतात, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येण्याचा सल्ला देतात, याकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वांचे लक्ष आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com