नारायण राणेंना नवी दिल्लीचे तातडीने निमंत्रण; मोठ्या घडामोडींची चिन्हे

केंद्रीय मंत्रीपदासाठी राणे यांचे नाव आघाडीवर
narayan rane.
narayan rane.

नवी दिल्ली : केंद्रिय मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा जोरात सुरु झाल्या असून त्यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या नावांत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाची जोरदार हवा आहे. त्यामुळे राणे हे आज सायंकाळी तातडीने नवी दिल्लीकडे रवाना झाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राणेंचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

राणे हे कोणाला भेटणार, हे अद्याप कळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विस्ताराविषयी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मंत्रीमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस हे मोदी यांना गेल्या दहा दिवसांत दोन वेळा भेटले. तसेच इतर राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते यांच्याशीही मोदींनी चर्चा केल्याचे समजते आहे. त्यातून काही नावांविषयी आडाखे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात राणेंचे नाव आघाडीवर आहे. मात्र मोदी हे अनेकदा धक्कातंत्र अवलंबतात. त्यामुळे माध्यमांतून चर्चिली जाणारी नावे त्यांच्या यादीत हमखास नसतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे राणे यांच्या नवीन राजकीय इनिंगचे काय होणार, याची उत्सुकता आहे.

नंदुरबारच्या खासदार डाॅ. हिना गावित यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, सांगलीचे संजयकाका पाटील आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्याही नावांना पसंती आहे. (New faces from Maharashtra may include in Modi Govt expansion) 

राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते.

राणेंना राज्यात फडणविसांच्या मंत्रीमंडळात घेण्यात शिवसेनेचा आधीच्या युती सरकारमध्ये प्रचंड विरोध होता. एवढेच नाहीतर राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यालाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊ शकले नव्हते. राणेंना राज्याच्या मंत्रीमंडळात न घेण्याच्या शिवसेनेच्या अटीमुळे त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले. तेथेही त्यांना फारशी संधी मिळाली नाही. या दोन पक्षांतील संबंध विकोपाला गेल्यानंतर राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे शिवसेनेला रोज झोडण्याचे काम इमाने-इतबारे करत आहेत. त्याचा फायदा राणेंना होणार का, याच त्यामुळे उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com