'लुकआऊट'वर महत्वाचा खुलासा करत नारायण राणेंनी दिला इशारा

राणे यांच्या पत्नी नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी केलं आहे.
Narayan Rane gives explanation of lookout circular
Narayan Rane gives explanation of lookout circular

मुंबई : कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी केलं आहे. त्यामुळं राणेंच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. तसेच ही कारवाई केंद्र सरकारच्या पत्रानंतरच करण्यात आल्याचा खुलासाही राज्य सरकारनं केला आहे. (Narayan Rane gives explanation of lookout circular)

नारायण राणे यांनी या सर्क्युलरविषयी माध्यमांना महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, हे सर्व चुकीचे आहे. आम्हाला कसलीही नोटीस प्राप्त झाली नाही तसंच त्याविषयी काहीही माहिती नाही. आम्ही आधीच 25 कोटी रुपयांचं कर्ज फेडलं आहे. बँकेला कर्जावरील व्याजाच्या रकमेविषयी विचारणा केली असून त्यावर 16 ऑक्टोबर रोजी तडजोड होणार आहे, असं राणे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, एका कर्ज प्रकरणात नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पणे पोलिसांनी गुरूवारी लुकआउट सर्क्युलर जारी केले आहे. डीएचएफएल कर्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. त्यांनी 65 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याची तक्रार पोलिसांकडं आली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीनं ही तक्रार दिली आहे. 

पंचवीस कोटींचे कर्ज घेतलेल्या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपनीच्या नीलम राणे या सह अर्जदार होत्या. आर्टलाईनकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नसल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तसेच नीलम हॉटोल्स प्रा. लि. या कंपनीने 40 तोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याचीही 34 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पुणे पोलिसांनी तीन सप्टेंबर रोजी लुकआऊट सर्क्युलर बजावल्याचे समजते. न्यायालायच्या आदेशानुसार ही नोटीस काढण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. त्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली. यावरून भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. ही कारवाई सूडबुध्दीने करण्यात आल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर राणे यांनी दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा मुख्यमंत्री व शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यातच आता राणे कुटूंबातील दोघांना लुकआऊट नोटीस बजावण्यात आल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com