मराठा आरक्षणासाठी मोदी, राणेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेले, असा आरोप मोडनिंब येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Sarkarnama (64).jpg
Sarkarnama (64).jpg

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच मराठा समाजाला आरक्षण देतील, यासाठी मोदी आणि  राणे यांच्या प्रतिमेला शंभर लीटर दुधाने दुग्धाभिषेक घालण्यात आला. सोलापुरातील मोडनिंब येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यक्रर्त्यांनी हा दुग्धाभिषेक घातला आहे. 

नारायण राणे यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेले, असा आरोप मोडनिंब येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.  महाविकास आघाडी सरकारचा निषेधही यावेळी करण्यात आला.

कोकणात शिवसेनेचा नारायण राणेंना धक्का      
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा नुकतीच पार पडली. जनआशीर्वाद यात्रेमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackaray) बोचरी टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप आमने सामने आले होते. जनआशीर्वाद यात्रेनंतर कोकणात राणेंना धक्का बसला आहे. देवगडचे दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या दोन्ही नगरसेवकांनी शिवबंध हाती बांधले आहे. 


अजितदादा म्हणाले, ''सर्वच बंद करण्याची वेळ आणू नका''
पुणे :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा पुढे करण्यात येत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी केली.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com