नारायण राणेंची ठाकरेंवर टीका.. 'असा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही.. पायगुण चांगला नाही..' - Narayan Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंची ठाकरेंवर टीका.. 'असा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही.. पायगुण चांगला नाही..'

अनंत पाताडे 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

राज्याच्या परिस्थितीचा त्याचा अभ्यास आहे का.. असा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही," अशी टीका  नारायण राणे यांनी आज केली.

सिंधुदुर्ग : "पुरामुळे राज्यात हाहाकार उडाला आणि आता हे घरातून बाहेर पडत आहेत. मुख्यमंत्री काय पाहणार.. पाहून ते शेतकऱ्यांना काय  देणार आहे.. राज्याच्या परिस्थितीचा त्याचा अभ्यास आहे का.. असा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही," अशी टीका माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी आज केली. कणकवली येथे एका कार्यक्रमानंतर राणे पत्रकरांशी बोलताना केली.   

नारायण राणे म्हणाले की  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची सोलापूर पासून पाहणी करणार करणार आहेत.  मुख्यमंत्र्यांना त्यांचे कर्तव्य माहिती नाही, कोरोनामूळे लोकांचे बळी गेले, तरीही मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाही. या सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, सरकारचा पायगुण चांगला नाही. सरकारची तिजोरी खाली आहे. हे सरकार दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा नुसत्या घोषणा करीत आहेत. प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. मी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितले की अद्याप पैसे आलेले नाही. ही परिस्थिती आहे. तरी आम्ही विरोधी पक्ष या नात्याने सरकारला दुष्काळी परिस्थितीत पैसे द्यायला भाग पाडू.

हेही वाचा : शरद पवार शेताच्या बांधावर..मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवर...? 

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत. शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत, असे तरी सध्याचे चित्र आहे.  या पार्श्वभूमीवर शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सूचना देत आहेत. या दोन्ही घटनेबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे घरात बसून बैठका घेतात या विषयावरून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख