"भुताटकी मंत्रालय, वर्षा व मातोश्री इथं आहे..तिथं शांती घाला.."  नारायण राणेंचा टोला - narayan rane criticized cm uddhav thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

"भुताटकी मंत्रालय, वर्षा व मातोश्री इथं आहे..तिथं शांती घाला.."  नारायण राणेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

कोरोना औषधांच्या टेंडरमध्ये हे सरकार पैसे खातंय.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray कोकणात आले पण लोकांना भेटलं नाही. ते लगेच मातोश्रीवर गेले. ते कोकणात पिकनिकला गेले होते का, असा सवाल माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे Narayan Rane यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याच्या कोकण दैाऱ्यावर टीका करताना विविध विषयांवरुन त्यांच्यावर निशाणा साधला. narayan rane criticized cm uddhav thackeray

नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणात पिकनिकला गेले होते. लोकांना का नाही भेटले ते ? अजून पॅकेज जाहीर केलेले नाही. सरकारच्या तिजोरीत देण्यासारखे काही नाही.   कोरोनाच्या नावाखाली यांची टक्केवारी वाढली आहे. सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यासहीत समोर आणणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील भष्ट्राचार जनतेसमोर आणणार आहे. 
कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये हे सरकार पैसे खातंय. प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी उघड करणार आहे. भ्रष्टाचाराने माखलेले हे सरकार आहे. 

"त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही.." रामदेव बाबाचे पुन्हा वादग्रस्त विधान

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांनी फाईल गहाळ झाल्याची चर्चा होती, त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका करीत म्हटलं होते की राजभवनातील फाईल कोणत्या भुतांनी नेली. यावर राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, राज्यपालांवर ठराविक वेळेतच नावे मंजूर करण्याचे बंधन नाही. भुताटकी मंत्रालय, वर्षा व मातोश्री इथं आहे. तिथं शांती घाला.

मराठा आरक्षणावर नारायण राणे म्हणाले की, मराठा आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या मनात आरक्षण देण्याचे नाही. शिवसेने नेते उदय सामंत पक्षात समाधानी नसतील म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटले असतील. कुणीही आले तरी स्वागत करेन.

मागच्या वेळी सिंधुदुर्गाला 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सिंधुदुर्गाला 50 लाख रुपयेच मिळाले. आता पुन्हा मुख्यमंत्री कोकणात आले.  दोन दिवसात कोकणवासीयांना मदत जाहीर करू असं म्हणाले. अजून मदत जाहीर केली नाही. कोकणाला 200 कोटींचं पॅकेज जाहीर झालं पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली.
Edited by : Mangesh Mahale  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख