"फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल... शिवसेनेला प्रत्युत्तर - Nanar project BJP answer to Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

"फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल... शिवसेनेला प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने आता थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

सिंधुदुर्ग  : "राज्यातील महाविकास आघा़डीचं सरकार पडेल, पण नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही, भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसुचना निघेल," असे वक्तव्य भाजपचे माजी आमदार, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केलं आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने आता थेट प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे कोकणातील नाणार रिफायन्सी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. 

राज्यात भाजपची सत्ता येईल. देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी मुख्यमंत्री होतील, त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल, असाही दावा प्रमोद जठार यांनी केला. माजी आमदार प्रमोद जठार यांनी याबाबत व्हिडिओ शेअर करून शिवसेनेला आव्हान दिलं असल्याने आता नाणारवरून शिवसेना-भाजप यांच्यातील वाद पेटण्याची चिन्ह आहेत. 

या व्हिडिओमध्ये जठार म्हणतात की महाविकास आघा़डी सरकार पडेल, पण कोकणातील (रत्नागिरी) रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही, भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसूचना निघेल. शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करून दीड लाख युवकांचे रोजगार हिरावून घेवू नये.

काही दिवसापूर्वी नाणार समर्थकांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर हा प्रकल्प होणारच नाही, अशी भूमिका उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली होती. त्यानंतर या मुद्दावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूनं समर्थन वाढतंय यासाठी वकिलांचं शिष्टमंडळ नुकतचं गृहनिर्माण मंत्र्यांना जाऊन भेटलं. त्यांचं प्रमोद जठार यांनी अभिनंदन केले आहे.
 
हेही वाचा: मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा विनापरवानगी लोकल प्रवास.. 

मुंबई : सामान्य जनतेसाठी रेल्वेने प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मुंबईत रेल्वे प्रवास आंदोलन करण्यात आले. मनसेनेचे नेत संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी विनापरवानगी रेल्वेने प्रवास करून आंदोलनास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी रेल्वेने प्रवास केला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे पोलिसांनी ठाण्यात रेल्वेने प्रवास करण्यास रोखले आहे. ठाणे रेल्वे परिसरात पोलिसांचा मोठी बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईकरांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांना रेल्वेने प्रवास करू द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी यांनी सरकारकडे केली आहे. आज जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे करण्यात येत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख