दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही : नाना पटोले (व्हिडिओ) - Nana Patole Unhappy over two days Assembly Session | Politics Marathi News - Sarkarnama

दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही : नाना पटोले (व्हिडिओ)

भारत नागणे
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेश दोन दिवसाचे होणार असल्याने विरोधी पक्षांनी आपेक्ष घेतला असतानाच, याबाबत खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाही अधिवेशनचा  वेळ कमी केल्याचे मान्य नसल्याची कबुली दिली. 

पंढरपूर : राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेश दोन दिवसाचे होणार असल्याने विरोधी पक्षांनी आपेक्ष घेतला असतानाच, याबाबत खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाही अधिवेशनचा  वेळ कमी केल्याचे मान्य नसल्याची कबुली दिली. 

विधानसभेचे काम अधिक चांगल्या पध्दतीने पार पडावे यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज  करता येईल का, विषयी देखील चाचपणी सुरू असल्या चे नाना पटोले यांनी आज येथे सांगितले.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आज पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्या नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "अधिवेशनाचा कालावधी कमी करणे हे काही लोकशाहीला धरून असल्याचे मान्य करता येणार नाही. मात्र, देशात कोरोना महामारीची स्थिती आहे. ती अमान्य करुन चालणार नाही कोरोनामुळे सभा गृहात गर्दी होऊ नये यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाचा दोन दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. आमदारांना आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचे अधिवेशनात स्वातंत्र्य असते. यातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. कालावधी कमी असल्याने आमदारांवर देखील मर्यादा येतात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करणे हे लोकशाहीला पोषक नाही,"

''पंढरपूर हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र आहे. पंढरपूरच्या विकासा संदर्भात लवकरच माझ्या दालनात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्री आणि अधिकाऱ्यां समवेत लवकरच बैठक घेणार आहे. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यां आंदोलन सुरू केले आहे. पंतप्रधानांनी पुढे येवून मागण्या संदर्भात विचार करावा,'' असेही नाना पटोले यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रे दरम्यान पंढरपूर शहरात लावण्यात आलेल्या संचारबंदी बाबत आपण माहिती घेऊ. चुकीच्या पध्दतीने संचार बंदी लागू केली असेल, तर चौकशी केली जाईल, असेही पटोले यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख