धनंजय मुंडेंच्याही आधी सुनील शेळके आणि संदीप क्षीरसागर यांचीच नावे अजितदादांच्या ओठी!

या दोन आमदारांवर अजितदादांचा भारी विश्वास....
devendra fadnavis-ajit pawar
devendra fadnavis-ajit pawar

मुंबई : महाआघाडी सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच महाराष्ट्राला राजकीय हादरा देणाऱ्या घटनांचीही उजळणी सध्या सुरू आहे. सत्तास्थापनेच्या गेल्या वर्षीच्या नाटकाचा परमोच्च बिंदू ठरला होता तो देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी. या शपथविधीवर आतापर्यंत चार पुस्तकांत वेगवेगळी व्हर्जन्स आली आहेत. नुकत्याच आलेल्या चौथ्या पुस्तकात फडणविसांचे प्रश्न आणि त्याला अजित पवारांची उत्तरे पुढे आली आहेत.

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार  यांच्या शपथविधीची वेगळी बाजू या पुस्तकात आली आहे. लेखिका प्रियम गांधी यांच्या ट्रेडिंग पाॅवर या पुस्तकात फडणवीस यांची बाजू असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.   अजित पवारांनी त्यावेळी कोण कोणत्या आमदारांची नावं घेतली होती? हा सर्व तपशील या पुस्तकात आहे.

राष्ट्रवादी सुरवातीला भाजपसोबत येण्यास तयार होती. मात्र नंतर फिस्टकले. त्यावरून फडणवीस यांनी अजितदादांना मेसेज केले. तेच मेसेज पुस्तकात असल्याचा लेखिकेने केला आहे. ते मेसेज

दादा, भाजप-राष्ट्रवादीच्या डीलला पवारसाहेबांचा पाठिंबा बहुधा मिळणार नाही असं दिसतंय. सगळीकडून आमच्या सूत्रांना हेच समजतंय. नेमकं काय चाललंय, असे फडणविसांनी विचारल्यानंतर अजित पवारांनी पाठविलेल्या उत्तरात सेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील, असे शरद पवारांना वाटते. अशी संधी कोण बरं सोडेल, असे म्हटले आहे.  

तुमची भूमिका काय आहे, असे फडणवीसांनी अजित पवारांना त्यावर विचारले. त्यावर मी भाजपसोबतच असल्याचे दादांनी स्पष्ट केले. त्यावर फडणविसांना शंका आली आणि तुम्ही पुरेसं संख्याबळ जमवू शकाल का, असा प्रशअन विचारला. त्यावर दादांनी या घडीला माझ्याकडे २८ आमदार आहेत. मी जे म्हणेन ते ते करतील. तुमच्याकडे असलेलं संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फडणविसांनी साहजिकच ते आमदार कोण आहेत, याची उत्सुकता वाटली आणि तसे दादांना विचारले. दादांनी पहिल्याच झटक्यात सुनील शेळके, संदीप क्षीरसागर या दोघांची नावे घेतली. त्यानंतर राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील याशिवाय तेरा आणखी अशा मोठ्या आत्मविश्वासाने अजितदादांना आमदारांची यादी वाचून दाखवली.

या आमदारांना राज्याच्या बाहेर घेऊन जावे, असा सल्लाही फडणविसांनी त्यांनी दिला. उलट दादांनीच त्यास नकार दिला आणि इतर आमदारांबरोबर हे आमदार राहिले तर कदाचित ते इतरांचं मनपरिवर्तन करू शकतील, असे त्यांनी सांगितले. तसेच चार आमदारांचा एक गट करू. माझ्या विश्वासातले २८ आमदार ग्रुप लीडर म्हणून काम करतील. उरलेल्या एक-एक दोन आमदारांशी बोलून त्यांचं मन वळवण्याचं काम या २८ आमदारांवर सोपवलं जाईल, असे ही दादांनी सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

पुढे हे आमदार सर्व पहाटेच्या शपथविधीला येऊ शकले नाही. ही नावे पाहिली तर नवीन आमदारांवर दादांचा जास्त विश्वास होता. सुनील शेळके हे भाजपचा गड असलेल्या मावळमधून निवडून आले होते. दादांनी त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीत मोठ्या बहुमताने विजयी झालेल्या उमेदवारांत त्यांचा समावेश होता. तसेच संदीप क्षीरसागर यांनाही त्यांच्या काकांच्या विरोधात उमेदवारी देण्यात दादांचा मोठा सहभाग होताय त्यामुळे या दोन व इतर तरुण आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांवर दादांचा विश्वास होता. राजेंद्र शिंगणे शपथविधीला दादांसोबत होते पण त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन शपथविधीची वार्ता त्यांच्या कानी टाकली होती. धनंजय मुंडे हे साऱ्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणार होते. मात्र ते पण शथपविधीला न जाता मित्राच्या फ्लॅटवर झोपून राहिल्याचा उल्लेख इतर काही पुस्तकांत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com