'अॅलोपॅथी'वर टीका करणाऱ्या रामदेव बाबांच्याविरोधात याचिका दाखल.. - muzaffarpur court petition in demanding to file sedition case against ramdev baba | Politics Marathi News - Sarkarnama

'अॅलोपॅथी'वर टीका करणाऱ्या रामदेव बाबांच्याविरोधात याचिका दाखल..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

रामदेव बाबा यांचे म्हणणे फसवे असल्याचे ज्ञान प्रकाश यांनी याचिकेत  म्हटलं आहे.

नवी दिल्ली  : अॅलोपथी औषध, आणि डॉक्टरांवर टीका करून डॉक्टरांना २५ प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान करणाऱ्या योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी मुझफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. muzaffarpur court petition in demanding to file sedition case against ramdev baba 

अनेक राजकारणी, बॉलिवूड स्टार आणि परदेशातील व्यक्तींविरोधात याचिका दाखल करणारे करून ज्ञान प्रकाश यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ज्ञान प्रकाश यांचे नाव पुन्हा चर्चेत आले होते. रामदेव बाबा यांचे म्हणणे फसवे असल्याचे ज्ञान प्रकाश यांनी याचिकेत  म्हटलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याव्यतिरिक्त देशद्रोह आणि फसवणुकीसंबंधित आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ता. 7 जून रोजी होणार आहे.  

मेहुल चोकशीच्या जीवाला धोका..प्रत्यार्पणाचा आज फैसला..

उत्तराखंडच्या इंडिअन मेडिकल असोसिएशन शाखेकडून (IMA) रामदेव बाबांवर १ हजार कोटींचा मानहानी दावा करण्यात आला आहे. आयएमएने रामदेव बाबांना याबाबतची नोटीस पाठविली आहे.  असोसिएशनचे सचिव डॉ. अजय खन्ना म्हणाले की, रामदेव बाबांना अॅलोपथी मधले अ सुद्धा माहिती नाही. आम्ही त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ पण त्यापूर्वी त्यांनी आपली योग्यता सिध्द करावी. आम्ही रामदेवबाबांना १५ दिवसाची मुदत दिली आहे. या वेळात त्यांनी केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.

आयएमएने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर रामदेव बाबा यांना अटक करा, असा हॅशटॅश सुरु आहे. त्यावर रामदेव बाबा यांनी काल म्हटले, "मला त्यांचा बापही अटक करु शकत नाही. " यावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.

योगगुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपथी बाबत केलेल्या विधानाबाबत तृणमूल कॅाग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या रामदेव बाबांवर भडकल्या होत्या.  मोदी आणि शहा यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी बाबा रामदेव यांना सुनावलं. खासदार महुआ मोईत्रा यांनी टि्वट करुन रामदेव बाबांवर निशाणा साधला होता.  

आपल्या टि्वटमध्ये खासदार महुआ मोईत्रा म्हणतात की, “स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही.” रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं.  
 
Edited by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख