नेतृत्वावर निष्ठा दाखविण्यासाठी मुश्रीफांची धडपड : चंद्रकांत पाटील  - Mushrif's struggle to show loyalty to leadership: Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

नेतृत्वावर निष्ठा दाखविण्यासाठी मुश्रीफांची धडपड : चंद्रकांत पाटील 

निवास चौगले 
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

महाराष्ट्रात काही ही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही म्हणायचे नसते. पण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना म्हणायचे असते. नेतृत्त्वावर निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड ते करत असतात, त्यांची ही सवय म्हणजे "आ बैल मुझे मार' अशी आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. 

कोल्हापूर : महाराष्ट्रात काही ही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही म्हणायचे नसते. पण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना म्हणायचे असते. नेतृत्त्वावर निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड ते करत असतात, त्यांची ही सवय म्हणजे "आ बैल मुझे मार' अशी आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. 

आमदार चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देत त्याद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा समाचार घेतला आहे. 

"राज्यात सन 2014 ते 2019 काळात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्यांना इतक्‍या उशीरा का जाग आली आहे ? बदल्यांमध्ये घोटाळे झाले, त्यावेळी काय तुम्ही झोपा काढत होतात काय? इतक्‍या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा. पण, त्याआधी 2020 मध्ये करण्यात आलेल्या बदल्यांची चौकशी करा.

आम्ही राज्यातील जनतेसाठी कामे केली आहेत, पण तुम्ही काही केले नाही तर तुम्हाला एवढं झोंबत कशाला?' असा सवालही आमदार चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकाच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला आहे. 

ग्रामपंचायतींना प्रशासक, पीएम केअर्स, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायचे असतील तर कोण काय करणार ? मी जे म्हणतो, ते महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांनीच म्हटले आहे. आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही, अशी भूमिका पोलिस महासंचालकांनी घेतलेली आहे, त्यावर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी पहिल्यांदा बोलावे, असेही या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे. 

सध्या कोल्हापुरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाहीत, स्वॅबच्या रिपोर्टमध्ये गोंधळ असा हाहाकार माजल्याच्या बातम्या रोज प्रसार माध्यमांतून येत असतात.

त्याबाबत हसन मुश्रीफ काहीही बोलत नाहीत. पण, राज्यात घडणाऱ्या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे; म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचे हे म्हणजे "गिरे तो भी .....' असे म्हणल्यातला प्रकार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकातून केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख